Next
रोटरी क्लबतर्फे निरीक्षणगृहात वृक्षारोपण
प्रेस रिलीज
Thursday, August 03, 2017 | 02:31 PM
15 0 0
Share this article:

निरीक्षण गृह येथे वृक्षारोपण करताना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी. शेजारी नगराध्यक्ष राहुल पंडित, देवदत्त मुकादम आदी मान्यवर.रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निरीक्षणगृहात वृक्षारोपण करण्यात आले.

येथील रोटरी क्लबतर्फे नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले जातात. नीलेश मुळ्ये यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एका पाठोपाठ एक कामांचा धडाका लावला आहे. शहराच्या सामाजिक क्षेत्रात भरीव काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याला अनुसरून त्यांनी गेल्या महिनाभरात शहरात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी निरीक्षणगृहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला.

शहरातील निरीक्षणगृहाला ‘रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी’चे नेहमीच सहकार्य लाभत असते. नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नीलेश मुळ्ये यांच्या पुढाकाराने निरीक्षणगृहात वृक्षारोपण करण्यात आले. स्वतः राहुल पंडितही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या प्रसंगी ज्येष्ठ रोटेरियन अशोक घाटे, राजू घाग, देवदत्त मुकादम, मुकेश गुप्ता, धरमसीभाई चौहान, वेदा मुकादम, निरीक्षणगृहाचे डॉ. मु. न. पानवलकर, सुधाकर सावंत आणि श्री. शिंदे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search