Next
थायरॉइड दिनानिमित्त आरोग्य शिबिर
BOI
Thursday, May 25, 2017 | 12:32 PM
15 0 0
Share this article:

मिरज : येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक थायरॉइड दिनानिमित्त आज, गुरुवारी २५ मे रोजी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘या शिबिराचे आयोजन डॉ. कोल्हे थायरॉइड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. या शिबिरात आहारतज्ज्ञ रशिदा मकानदार मार्गदर्शन करणार आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुनील कोल्हे यांनी ही माहिती दिली.
दर वर्षी थायरॉइड दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन केले जाते. आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार, थायरॉइडच्या आजाराचे महिलांमध्ये असलेले जास्त प्रमाण, थायरॉइडच्या आजारामुळे वाढणारा लठ्ठपणा, वजन कमी किंवा जास्त होणे, वंध्यत्व यांबाबतच्या सर्व प्रकारच्या तपासण्या या शिबिरात करण्यात येणार आहेत.
तसेच मधुसखा ग्राहक भांडारातर्फे साखरविरहित वस्तू व खाद्यपदार्थांची माहिती देण्यात येणार आहे. विशेष उपकरणाद्वारे लठ्ठपणाचे मोजमाप करून थायरॉइडतज्ज्ञ सुनील कोल्हे रुग्णांवर उपचार करणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search