Next
प्रभासच्या बॉलीवूड पदार्पणातील ‘साहो’चे पोस्टर प्रदर्शित
चाहत्यांसमोर उलगडले ‘ते’ सरप्राईज
BOI
Tuesday, May 21, 2019 | 04:35 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : दक्षिणेतील सूपरस्टार आणि ‘बाहूबली’फेम अभिनेता प्रभास आगामी ‘साहो’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. दरम्यान आजच (२१ मे) या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमात पहिल्यांदाच प्रभासबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. 

सोमवारी (२० मे) प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून उद्या आपण एक सरप्राईज देणार असल्याची पोस्ट केली होती. त्याच्या या पोस्टनुसार आज (२१ मे) या चित्रपटाची घोषणा करत प्रभासने चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील हे पोस्टर शेअर केले असून, त्यासोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील शेअर केली आहे. दिग्दर्शक सुजीत हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

श्रद्धा कपूर आणि प्रभास‘साहो’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट असून तो हिंदी आणि तेलगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे आदर्श यांनी पोस्टरसोबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर चित्रपटात प्रभाससोबत प्रमुख भूमिकेत असून ती पहिल्यांदाच प्रभासबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याने चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

प्रभास आणि श्रद्धा कपूरव्यतिरिक्त या चित्रपटात नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, अरुण विजय, संपत राज हे कलाकारदेखील दिसणार आहेत. या बिग बजेट चित्रपटाचे बजेट ३०० कोटी आहे. माध्यमातील सुत्रांनुसार काही दिवसांपूर्वी अबू धाबीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या एकाच दृश्यावर ९० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. याशिवाय चित्रपटाच्या मध्यांतर सिक्वेन्सवर ३० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. यावरून हा चित्रपट दमदार असल्याचे दिसून येते. 

दरम्यान १५ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची टक्कर बॉलीवूडमधील दोन स्टार्स कलाकारांना होणार आहे. याच दिवशी अभिनेता अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांना प्रभासच्या ‘साहो’ची टक्कर निश्चितच असणार आहे.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search