Next
‘आवास’च्या प्रारंभी समभागाची विक्री २५ सप्टेंबरपासून
प्रेस रिलीज
Wednesday, September 19, 2018 | 04:23 PM
15 0 0
Share this article:मुंबई : आवास फिनान्शिअर्स लिमिटेडतर्फे २५ सप्टेंबर २०१८पासून प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरची प्रति इक्विटी शेअर प्राइसनुसार (शेअर प्रीमिअमसह) प्रारंभी समभाग विक्री केली जाणार आहे. यामध्ये चार हजार दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि १६,२४९,३५९ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे.

यामध्ये लेक डिस्ट्रिक्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून ८,८१५,४३९ पर्यंत इक्विटी शेअर्स, पार्टनर्स ग्रुप ईएससीएल लिमिटेडकडून ४,२८१,९०७पर्यंत इक्विटी शेअर्स (ईएससीएल आणि लेक डिस्ट्रिक्टबरोबर, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स), केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड१ कडून २३६,३३९ पर्यंत इक्विटी शेअर्स (केदारा एआयएफ १ किंवा इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर) आणि पार्टनर्स ग्रुप प्रायव्हेट इक्विटी मास्टर फंड एलएलसीकडून १,८७९,११ पर्यंत इक्विटी शेअर्स (मास्टर फंड किंवा प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स) आणि सुशील कुमार अग्रवालकडून ९११,५६४ पर्यंत इक्विटी शेअर्स व विवेक विगकडून १२५,०००पर्यंत इक्विटी शेअर्स (एकत्रित अदर सेलिंग शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स, इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर व प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डरसह सेलिंग शेअरहोल्डर्स आणि अशी ऑफर फॉर सेल ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहेत.

ही ऑफर २७ सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ८१८ रुपये ते ८२१ रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण १८ इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर १८ इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल. इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एडलविस फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड व स्पार्क कॅपिटल अॅडव्हॉयजर्स (इंडिया) लिमिटेड हे ऑफरसाठी ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स अँड बुक रनिंग लीड मॅनेजर्स (जीसीबीआरएलएम) आहेत. एचडीएफसी बँक लिमिटेड ही ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) आहे.

‘जीसीबीआरएलएम’ व ‘बीआरएलएम’ यांच्या सल्ल्याने, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, कंपनी व सेलिंग शेअरहोल्डर्स अँकर इन्व्हेस्टर्सच्या सगभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे २४ सप्टेंबरला असेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search