Next
‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन
BOI
Thursday, July 25, 2019 | 11:34 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१९मध्ये घोषित होणार्‍या वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार ‘कोसमाप’चे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.

प्रथम श्रेणीच्या सात पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. कादंबरी, कथा, कविता, समिक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांसाठी हे पुरस्कार दिले जातील. यात र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्कारांचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.

विशेष सात पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे असून, यात कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक एकांकिका, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाङ्मय पुरस्कार, वि. कृ. नेरूरकर संकिर्ण वाङ्मय पुरस्कार, अरुण आठल्ये संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकीका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुर्वाता वसई पुरस्कार यांचा समावेश आहे.

पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१९पूर्वी पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांच्याकडे पाठवाव्यात. लेखक, कवी ‘कोमसाप’च्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातील) असावा; तसेच तो ‘कोमसाप’चा आजीव सभासद असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचे ‘कोमसाप’ जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. पुस्तकाचा वाङ्मय प्रकाराचा स्पष्ट उल्लेख (कथा, कादंबरी, कविता, ललित वाड्.मय आदी) लेखकाने पुस्तकांसोबत करायचा आहे. पुस्तके एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या एका वर्षात प्रकाशित झालेली असावीत. एखाद्या लेखकाच्या, कवीच्या एका वाङ्मय प्रकाराच्या पुस्तकाचा पुरस्कारासाठी फक्त दोन वेळाच विचार केला जाईल, अशी माहिती ‘कोमसाप’चे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी दिली. 

पुस्तकाच्या प्रती पाठविण्यासाठी पत्ता : प्रा. अशोक रा. ठाकूर द्वारा सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, ता. जि. पालघर, ४०१ ४०४ यांच्याकडे पाठवाव्यात. 
ई-मेल : ashokthakur46gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search