Next
इंटरनॅशनल फ्लोरा एक्स्पोचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, February 05 | 05:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : इंटरनॅशनल फ्लोरा एक्स्पो २०१८चे आयोजन २३ ते २५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत करण्यात आले असून, वार्षिक प्रिमिअम इव्हेंट इंटरनॅशनल फ्लोरा एक्स्पो २०१८च्या या पर्वामध्ये भारतातील फ्लोरीकल्चर क्षेत्र मोठी झेप घेण्यास सज्ज आहे.

या प्रदर्शनामध्ये १२वे इंटरनॅशनल लँडस्केप अँड गार्डनिंग एक्स्पो २०१८ आणि १०वे इंटरनॅशनल हॉर्टी एक्स्पो २०१८ इव्हेंट्सचा समावेश असेल. देशभरातील आणि नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, पर्शियन गल्फ व अरेबियन देश यांसारख्या इतर देशांमधील फ्लोरीकल्चर व्यवसायाबाबत रुची असलेले भागधारक देशातील फ्लोरीकल्चर, हॉर्टीकल्चर, बाग साहित्ये व मशिनरीज आणि संबंधित क्षेत्रांवरील सर्वात मोठ्या प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत.

या १३व्या इंटरनॅशनल फ्लोरा एक्स्पोला कृषी मंत्रालय व त्यांचे विभाग, मिशन फॉर इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टीकल्चर (एमआयडीएच), नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्ड, नॅशनल कमिटी ऑन प्लास्टिकल्चर अ‍ॅप्लिकेशन्स इन हॉर्टीकल्चर, नॅशनल सेंटर फॉर कोल्ड-चेन डेव्हलपमेण्ट (एनसीसीडी), अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, अ‍ॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ऑथोरिटी (एपीईडीए), इंडियन नर्सरीमेन असोसिएशन (आयएनए), असोसिएशन ऑफ एन्व्हार्यन्मेंट हॉर्टीकल्चर, इंडियन फ्लॉवर्स अँड ऑर्नामेंटल प्लांट वेल्फेअर असोसिएशन (आयफ्लोरा) व इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरीकल्चर प्रोफेशनल्स (आयएसएफपी) यांचे पाठबळ लाभले आहे.

१३वे एक्स्पो दोन नवीन टप्पे स्थापित करणार असून, त्यातील पहिला टप्पा म्हणजे हे प्रदर्शन इंडियन फ्लॉवर्स अँड ऑर्नामेंटल वेल्फेअर असोसिएशन (आयफ्लोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या इंडियन फ्लोरल आर्टिस्ट चँपियनशिप २०१८ (आयएफएसी)चे आयोजन करणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात फ्लॉवर डिझाइनर्स, पुरवठादार, फ्लोरिस्ट्स, वेडिंग प्लानर्स फ्लोरल आर्टमधील नवीन ट्रेंड्स दाखवणार असून, या चँपियनशिपमध्ये भाग घेणार आहेत. दुसरा टप्पा म्हणजे इंडियन कन्व्हेंशन फ्लॉवर, प्लांट व ग्रीन इंडस्ट्री संस्था व लीडर्स यांच्या उत्तम प्रयत्नांना प्रशंसित करण्यासाठी फ्लॉवर लँड प्लांट इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड्स २०१८चे आयोजन करणार आहे. या संस्था व या प्रमुख व्यक्तींनी हरित क्षेत्रावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण केला आहे.

याप्रसंगी बोलताना एस. जाफर नाक्वी म्हणाले, ‘दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या एक अब्ज मूल्याच्या फ्लोरीकल्चर क्षेत्रात एक अब्ज रोजगाराच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देत असतानाच भारतात आमूलाग्र बदल घडवून आणत देशातील फ्लोरीकल्चर उद्योगाने जवळपास नऊ हजार कोटींचा (१.११७ बिलियन युरो) व्यवसाय केला आहे आणि हे उद्योग गेल्या पाच वर्षांमध्ये २५ टक्क्यांचा स्थिर सीएजीआर राखत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हा आकडा १० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची आशा आहे.’

फ्लोरा एक्स्पोविषयी :
कालावधी : २३ ते २५ फेब्रुवारी २०१८  
स्थळ : हिंदुस्तान अँटीबायोटिक एक्झिबिशन ग्राऊंड, पिंपरी, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link