Next
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, May 21, 2019 | 05:58 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर बुद्धपौर्णिमेपासून सुरू झालेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महामानवाची गौरवगाथा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच कमालीची उत्सुकता होती आणि याच उत्साहात मालिकेचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले.

महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी ही मालिका एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून खास स्क्रीनिंगचेही आयोजन केले होते, तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत या मालिकेचं प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केले. ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावरूनही प्रेक्षकांनी या मालिकेविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे कळवल्या आहेत. ‘या मालिकेच्या निमित्ताने घराघरात बाबासाहेबांचे विचार पोहोचतील, पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय, खूप शिकायला मिळतंय,’ अश्या आशयाच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातील एक महान पर्व आहे. इतिहासाचे हे सोनेरी पान या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा उलगडण्यात येत आहे. बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महामानव होण्यापर्यंतचा प्रवास मालिकेतून दाखवला जाणार आहे. डॉ. आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ने या मालिकेची निर्मिती केली आहे. 


अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारत असून, बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत रात्री नऊ वाजता दाखविली जात आहे. नितीन वैद्य यांच्या दशमी प्रॉडक्शॉनने या मालिकेची निर्मिती केली असून, अजय मयेकर या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search