Next
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी
BOI
Monday, September 25, 2017 | 06:05 PM
15 0 0
Share this article:

पंढरपूर : ‘शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली.

भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.

कॅनडा सरकारचे प्रतिनिधी आणि मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले तसेच राज्य सरकार प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर पंढरपूर शहराचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली. तीन ऑक्टोबरला ‘कौन्सिल जनरल ऑफ कॅनडा’ पंढरपुरात येणार आहेत.

या योजनेसाठी कॅनडा सरकार आणि मंदिर समिती, तसेच नगर परिषद यांच्यात करार होणार आहे. पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कॅनडा सरकार करणार आहे. कॅनडा ट्रेड कॉर्पोरेशनच्या वतीने हे काम हाती घेतले जाणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 111 Days ago
It is now more than a year - and - a - half . Is it time to ask the question - what has been done , what is being done , who is Responsible for what . What is napping to the money not spent .
0
0

Select Language
Share Link
 
Search