Next
राकोल्डने जिंकला 'मोस्ट एनर्जी एफिशिअंट अप्लायन्स ऑफ द इयर' पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, December 21 | 02:10 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘राकोल्ड’ या वॉटर हीटिंग सुविधा देणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीचा स्टोअरेज वॉटर हीटिंग श्रेणीमध्ये ‘मोस्ट एनर्जी एफिशंट अप्लायन्स ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारणारा या श्रेणीतील हा एकमेव ब्रँड आहे.

‘ब्यूरो ऑफ एनर्जी’तर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार, संशोधन व विकास विभागाचे प्रमुख अभिजीत बनशेलकीकर यांना ऊर्जा आणि नवी व अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत दिल्लीतील एका शानदार समारंभात देण्यात आला.

ब्यूरो ऑफ एनर्जी, ऊर्जा मंत्रालय यांच्यातर्फे भारतातील निवडक क्षेत्रांतील तीनशे २२ ऊर्जाक्षम कंपन्यांपैकी विजेत्या कंपन्यांचा गौरव करण्यात आला. उद्योग व बीईई स्टार लेबल्ड उपकरणांचे निर्माते यांनी ऊर्जा संवर्धनासाठी आणलेल्या नाविन्याचा व यशाचा गौरव बीईईतर्फे केला जातो. हे पुरस्कार म्हणजे त्यांनी ऊर्जा संवर्धन व कार्यक्षमता यासाठी दाखवलेल्या बांधिलकीचीही पावती असते. या वर्षी ‘अप्लायन्स ऑफ द इयर’ या नव्या श्रेणीखाली सादर करण्यात आलेले पुरस्कार एअर कंडिशनर, सीलिंग फॅन, रेफ्रिजरेटर, स्टोअरेज वॉटर हीटर, टेलिव्हिजन व पंप अशा सहा उत्पादन श्रेणींतील सर्वात ऊर्जाक्षम मॉडेलची दखल घेतात.

राकोल्डने गेली सलग आठ वर्षे बीईईकडून हा पुरस्कार जिंकला असून, कंपनीला पहिला पुरस्कार २०१०मध्ये मिळाला होता. कंपनीच्या मुख्य उपक्रमांचा भाग म्हणून, राकोल्डने समाजामध्ये यशस्वीपणे पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण केली आहे. राकोल्ड दरवर्षी अधिकाधिक सक्षम होत आहे. राकोल्डची इलेक्ट्रिक स्टोअरेज वॉटर हीटरमधील ऊर्जाक्षम उत्पादने स्टार-रेटेड वॉटर हीटर्सच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ करत आहेत. २०२०पर्यंत, ८०% व्यवसाय उच्च कार्यक्षमता व अपारंपरिक पर्याय यातून मिळेल, असे 'अॅरिस्टन थर्मो' या राकोल्डच्या पेरेंट कंपनीचे उद्दिष्ट आहे.

या सन्मानाविषयी बोलताना, अॅरिस्टन थर्मो प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. रामनाथ यांनी सांगितले, “राकोल्डने प्रगतीच्या शाश्वत धोरणामध्ये ऊर्जाक्षमतेला केंद्रीय स्थान दिले आहे व ऊर्जासंवर्धनासाठी अतिशय प्रयत्नशील आहे. आमच्या उत्पादनांमध्ये अत्यंत ऊर्जाक्षम वॉटर हीटिंग सुविधांचा समावेश असून, त्यामुळे गुणवत्ता, कार्यक्षमता व आराम यांच्याशी तडजोड न करता ऊर्जेच्या वापरात घट करण्यासाठी योगदान दिले जाणार आहे. आम्ही नेहमीच समाजाच्या विकासाच्या दिशेने काम केले आहे व आमच्या ग्राहकांसाठी ऊर्जाक्षम उत्पादनांची निर्मिती केली आहे.”

राकोल्डने इटालियन डिझाइनर उम्बेर्तो पालेर्मो यांनी डिझाइन केलेले 'अँड्रिस' हे नवे स्टोअरेज वॉटर हीटर अलीकडेच देशभर दाखल केले. अँड्रिस हे प्रीमिअम डिझाइन असलेले वॉटर हीटर असून ते अंघोळीच्या ठिकाणाची शोभा नक्कीच वाढवतील.

आटोपशीर डिझाइन व थिक इंजेक्टेड पीयूएफ इन्सुलेशन यामुळे ते अतिशय ऊर्जाक्षम आहेत व बीईईने पाच स्टार देऊन हे अधोरेखितही केले आहे. अँड्रिसला आठ बारही दिले असून त्यामुळे त्यांना उच्च दाब सहन करता येतो व गगनचुंबी इमारतींसाठी ते साजेसे ठरतात. राकोल्डने अलीकडेच 'तुमच्या पालकांची काळजी' असा सामाजिक संदेश देणारे ब्रँडचे नवे अभियानही जाहीर केले आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link