Next
नाट्यपरिषदेच्या शाखाध्यक्षपदी महिलाच..
रंगधर्मी पॅनलचा निर्णय. दिग्गजांनी दर्शवला पाठिंबा
BOI
Friday, October 05, 2018 | 06:27 PM
15 0 0
Share this article:


पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर महिला कलाकाराचीच नियुक्ती करण्याचा निर्णय ‘रंगधर्मी’ पॅनलने एकमताने घेतला आहे, अशी माहिती पॅनलच्या उमेदवार शुभांगी दामले व भाग्यश्री देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या रविवारी (७ ऑक्टो.) होणाऱ्या या निवडणुकीत रंगधर्मी पॅनलला सर्व स्तरांतून वाढता पाठिंबा मिळत असून पॅनलचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास या वेळी दामले यांनी व्यक्त केला. रंगधर्मी पॅनलला सिने क्षेत्रातील कैक मान्यवरांचा जाहिर पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे, सिने व नाट्य कलावंत डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, सुचेता चाफेकर, डॉ. निलेश रावळे, प्राजक्ता माळी यांसारख्या अनेक कलावंतांनी रंगधर्मी पॅनलला जाहिर पाठिंबा दर्शवला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

परिषदेच्या कार्यालयाचे नुतनीकरण डॉ. श्रीराम लागू, लालन सारंग, श्रीकांत मोघे, प्रभाकर पणशीकर व अन्य काही कलावंतांच्या डीव्हिडी तयार करून नाट्यक्षेत्राचा वारसा जतन करण्याचे काम करण्यात आले. पुण्यातून दर्जेदार नाटकांची निर्मिती, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, संगीत, एकपात्री प्रयोग यांच्या कार्यशाळा. बालकलाकारांसाठी बारमहा मोफत नाट्य शिबिरे, युवा पिढीला मार्गदर्शन, नाट्य परिषद अद्ययावत कार्यालय, पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील विविध नाट्यगृहांमध्ये स्वच्छता, प्रेक्षकांसाठी उपयुक्त सोई-सुविधा यांसारख्या अनेक गोष्टींवर काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार असल्याचेही दामले यांनी या वेळी सांगितले.

या वेळी पॅनलचे मार्गदर्शक व नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, प्रमोद आडकर व अन्य उमेदवार उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search