Next
रत्नागिरीत औषधी वनस्पती अभ्यास सहल
BOI
Thursday, November 01, 2018 | 10:38 AM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटोरत्नागिरी : रत्नागिरीतील निसर्ग अभ्यासक विनायक बापट यांनी येत्या रविवारी, चार नोव्हेंबर रोजी औषधी वनस्पती अभ्यास सहल आयोजित केली आहे. शहरातील खालच्या आळीपासून मिऱ्या रोडपर्यंतच्या परिसरातील रस्त्याच्या कडेला आणि आसपास आढळणाऱ्या औषधी वनस्पतींची माहिती या वेळी दिली जाणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील विविध वनस्पतींची माहिती मिळावी, याकरिता अशी सहल प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. ही सहल विनामूल्य असून, विद्यार्थी, पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी चालत जायचे असून, सहभागी होणाऱ्यांनी सोबत पाणी घेऊन यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. चार नोव्हेंबरला सकाळी साडेआठ वाजता खालच्या आळीतील दत्त मंदिरात जमावे, असे कळवण्यात आले आहे. इच्छुकांनी तीन नोव्हेंबरपर्यंत विनायक बापट (९४२३० ४८९९१) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link