Next
‘डीकेटीई’मध्ये ‘बीटेक सिव्हील’ आणि ‘बीटेक इलेक्ट्रिकल’ पदवी अभ्यासक्रम
प्रेस रिलीज
Friday, June 22, 2018 | 12:30 PM
15 0 0
Share this story

इचलकरंजी : ‘डीकेटीई सोसायटीच्या टेक्स्टाइल अँड इंजिनीअरिंग अ‍ॅटोनोमॉस इन्स्टिट्यूटमध्ये सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई (न्यू दिल्ली) व डीटीई (मुंबई) यांच्याकडून बीटेक सिव्हिल इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. याशिवाय फॉरेन विद्यार्थ्यांसाठी कोटा मंजुर होऊन संस्थेतील काँप्युटर सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमास १२० जागांची मान्यता देखील मिळालेली आहे. दोन्ही नवीन अभ्यासक्रमात प्रत्येकी ६० जागांना नुकतीच मान्यता दिली आहे,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘मानवाच्या मूलभूत गरजांपैकी सिव्हिल इंजिनीअरिंग ही गरज असल्याने, तसेच वस्त्रोद्योगामध्ये इलेक्ट्रिकल कोर्सचे महत्त्वाचे योगदान असल्याने या दोन्हीं अभ्यासक्रमासाठी पालकांच्या व विद्यार्थ्यांमधून होत असलेल्या मागणीनुसार या कोर्सेससाठी संस्थेने एआयसीटीईकडे मागणी केली होती. या कोर्सेसमुळे इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात ‘बीटेक’ ही पदवी संपादन करण्याची संधी निर्माण झाली आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.’

डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले म्हणाले, ‘अभियांत्रिकी शिक्षणामध्ये अव्वल असलेल्या डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये नव्याने सुरू होणारे हे दोन पदवी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी पीएचडीधारकसह खास तज्ज्ञ प्राध्यापक असून, या प्राध्यापकांचा लाभ येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अद्ययावत अशा ‘अ‍ॅडव्हॉन्सड रिसर्च लॅब’ची सोयही आहे. या सर्व अत्याधुनिक सुविधा संस्थेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच परदेशी विद्यापीठाशी करार करणार येणार असल्याने येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणांची सुविधा उपलब्ध होणार आहे.’

एआयसीटीई, दिल्ली यांच्याकडून या शैक्षणिक वर्षापासून काँप्युटरमध्ये ६० जागा वाढवून १२० जागा झाल्या आहेत. यापूर्वी ‘डीकेटीई’ने केलेल्या जागतिक पातळीवरील शैक्षणिक प्रगतीमुळे ‘एआयसीटीई’ने संस्थेस अॅडिशनल फॉरेन कोटा मंजुर केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून परदेशातील विद्यापाठातील विद्यार्थी ‘डीकेटीई’मध्ये येऊन पदवी शिक्षण पूर्ण करू शकतात. यामध्ये बीटेक टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी व टेक्स्टाइल केमिस्ट्री या कोर्सेसचा समावेश आहे. या कोर्सेसना पूर्वीपासून परदेशी विद्यार्थ्यांना शिकण्याची मागणी होती. आता ती मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे इचलकरंजीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांसाठी दालन खुले झाले असून, वस्त्रोद्योग शिक्षणाचे नाव जागतिक पातळीवर आता मोठ्या सन्मानाने घेण्यात येणार आहे.

प्रकाश आवाडे म्हणाले, ‘१९८२ साली डिप्लोमा कोर्ससह स्थापन झालेली ‘डीकेटीई’ संस्था आज जागतिक पातळीवर अनेक शिखरे सर करीत आहे. नुकतेच ‘डीकेटीई’स ‘बेस्ट इंडस्ट्री-लिंक्ड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट’ हा देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवनवे उपक्रम, नवनवे अभ्यासक्रम आणि अव्वल गुणवत्तेचा आग्रह धरत अनेक यशोशिखरे या महाविद्यालयाने व येथील विद्यार्थ्यांनी सर केली आहेत.

‘पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची माहिती डीटीई, मुंबई यांच्याकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून, विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी वेबसाईटवर संपर्क साधावा,’ असे आवाहन डॉ. कडोले यांनी केले आहे.

या वेळी संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांच्यासह डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, डॉ. आर. ए. पाटील, डॉ. एम. बी. चौगुले, डॉ. व्ही. जयश्री, डॉ. आर. एन. पाटील व प्राध्यापक उपस्थित होते.  

अधिक माहितीसाठी वेबसाइट : www.dtemaharashtra.gov.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link