Next
‘बीएआय’तर्फे व्ही. जी. जाना यांना जीवनगौरव पुरस्कार
प्रेस रिलीज
Tuesday, December 18, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this article:पुणे : बांधकाम क्षेत्रात होणार्‍या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या हेतूने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे वार्षिक वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यात झाला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘बीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष ए. पुहाजेंडी, ‘बीएआय’ पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रताप साळुंके, ‘बीएआय’ पुणे सेंटरचे अध्यक्ष प्रदीप गर्गे, माजी अध्यक्ष व वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन (बीएससी) २०१८चे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आर. बी. सूर्यवंशी, ‘डब्ल्यूबीएससी’चे समन्वयक नंदकुमार जेठानी, ‘बीएआय’ पुणे सेंटरचे मानद सचिव अशोक अटकेकर, महेश मिरानी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बीजी शिर्के कन्स्ट्रक्शनचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी व्ही. जी. जाना यांना बीएआय-शिर्के निर्माण रत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दर वर्षीप्रमाणे या कार्यक्रमात ‘बीएआय’ डायरीचे अनावरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचे बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन हे मुख्य प्रायोजक आहेत.‘डब्ल्यूबीएससी २०१८’ पुरस्कार विजेत्यांमध्ये वायचळ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (रेसिडेंशियल-बंगलो, रो हाउसेस, स्टँड अलोन बिल्डिंग्स), प्राइड बिल्डर्स एलएलपी (रेसिडेंशियल- हाउसिंग कॉम्प्लेक्स), कामाक्षी कन्स्ट्रक्शन्स (कमर्शियल), आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (इंडस्ट्रीयल), आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (इन्फ्रास्ट्रक्चर), एसजे कॉन्ट्रॅक्टस प्रा. लि. (वेल इक्विप्ड, वेल मेकनाइज्ड), व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि. (गव्हर्नमेंट), मिलेनियम इंजिनीअर्स अ‍ॅंड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. (वर्क अप टू कोल्ड शेल- आरसीसी, मॅसोनरी अ‍ॅंड प्लास्टर वर्क्स) यांचा समावेश आहे.

‘बीएआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष ए. पुहाजेंडी व ‘बीएआय’ पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष साळुंके यांनी पुणे सेंटरच्या कार्याचे कौतुक केले. गर्गे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जगन्नाथ जाधव यांनी या पुरस्कारांबाबत माहिती दिली. परीक्षक मंडळाचे अध्यक्ष धनंजय हिरवे यांनी निवडप्रक्रियेबाबत माहिती दिली. अटकेकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search