Next
‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात हजार नवीन बसेस
प्रेस रिलीज
Monday, November 19, 2018 | 05:06 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या १७ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवीन बस घेण्याबरोबरच प्रवासीभाडे वाढीच्या प्रस्तावावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट २०१९पर्यंत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात एक हजार नवीन बसेस समाविष्ट होणार असून, प्रत्येक बस थांब्यावर नागरिकांना दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध होणार आहेत. बसच्या प्रवासीभाड्यात कोणतीही वाढ करण्याचा प्रस्ताव या बैठकीत नाकारण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘पीएमपीएमएल’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी महापौर मुक्ता टिळक यादेखील उपस्थित होत्या.

पुण्यासाठी ४०० सीएनजी नॉनएसी बस विकत घेण्यात येणार आहेत. या बस जुलै २०१९पर्यंत टप्प्याटप्प्याने समाविष्ट होणार आहेत; तसेच १५० नवीन इलेक्ट्रिक बसही ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात येणार असून, त्यातील पहिल्या २५ इलेक्ट्रिक बस २६ जानेवारी २०१९पर्यंत पुण्याच्या रस्त्यांवर धावतील, तर १२५ एसी इलेक्ट्रिक बस मे २०१९पर्यंत धावणार आहेत. याशिवाय ४४० नॉनएसी सीएनजी बस भाडेतत्वावर घेण्यात येणार असून, त्या ऑगस्ट २०१९पर्यंत धावतील.

या वेळी बोलताना शिरोळे म्हणाले, ‘या निर्णयांबरोबरच या बैठकीत ‘पीएमपीएमएल’चा २०१३चा आस्थापना आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बढत्यांचा मार्ग मोकळा होणार आहे; तसेच बदली, हंगामी, रोजंदारी सेवकांना कायम करण्याचा मार्गही सुकर होणार आहे. २०१३चा आस्थापना आराखडा मंजूर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता वाढेल.’

‘पीएमपीएमएल’चे उत्त्पन्न वाढवण्यासाठी प्रवासभाडे वाढवण्यापेक्षा इतर पर्यायी उपाययोजना केल्या जाणार असून, त्यासाठीचा आराखडा तयार करून अंमलात आणणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link