Next
६२ विद्यार्थ्यांची के. सी. महिंद्रा शिष्यवृत्तीसाठी निवड
प्रेस रिलीज
Wednesday, July 17, 2019 | 06:18 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टतर्फे (केसीएमईटी) के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अॅब्रॉडसाठी आलेल्या तेराशे अर्जांपैकी ६२ उमेदवारांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली. पहिल्या तीन गुणवान विद्यार्थ्यांना प्रत्येकी आठ लाख रुपयांची, तर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 

भारतातील सर्वोत्तम व गुणवान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्याच्या हेतूने दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तींचे या वर्षी एकूण मूल्य २.६ कोटी रुपये आहे. निवडलेल्या उमेदवारांमध्ये आयआयटीमधून ग्रॅज्युएट झालेले २८ विद्यार्थी आहेत व उर्वरित विद्यार्थी बिट्स पिलानी, नॅशनल लॉ स्कूल्स, लेडी श्री राम कॉलेज, सेंट झेविअर्स कॉलेज, सेंट स्टिफन्स व सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अशा अन्य नामवंत शैक्षणिक संस्थांमधले आहेत. उमेदवारांनी परदेशातील हार्वर्ड, स्टॅनफर्ड, कोलंबिया, कार्नेज मेलन, मिशिगन, यूसी बार्कले, जॉर्जिया टेक, पेनसिल्व्हानिया, लंडन बिझनेस स्कूल, ऑक्सफर्ड, एलएसई व केम्ब्रिज या सर्वोधिक क्रमवारीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतले असून, हे विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंग, एमबीए, लॉ, पब्लिक पॉलिसी व अर्थशास्त्र अशा विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. 

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, महिंद्रा इंटरट्रेड लि.चे अध्यक्ष भारत दोशी, ब्रिस्टलकोनचे अध्यक्ष उल्हास यारगोप, इंडियन स्कूल ऑफ डिझाइन अँड इनोव्हेशन व इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंट्रप्रिन्युअरशिपच्या प्रेसिडेंट आणि अध्यक्ष डॉ. इंदू शहानी, ग्लोबल स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट कन्सल्टंट व चेंज मॅनेजमेंट एक्स्पर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सल्लागार रंजन पंत, आणि महिंद्रा समूह अध्यक्षांच्या ईए ऐश्वर्या रामकृष्णन यांचा निवड समितीत समावेश होता. या समितीने निवडलेल्या उमेदवारांच्या दोन दिवस मुलाखती घेतल्या.

या विषयी बोलताना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘वैयक्तिक जीवन व एकंदर देशामध्ये परिवर्तन आणण्यासाठी शिक्षणामध्ये असलेली क्षमता महिंद्रा समूह जाणतो. भारतातील तरुणांमध्ये असलेली क्षमता चकित करणारी आहे आणि यंदाही हेच दिसून आले. के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप्स खऱ्या अर्थाने उल्लेखनीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यातील प्रत्येकजण या संधीचा वापर त्यांच्या जीवनात व एकंदर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी करतील, अशी अपेक्षा आहे.’

संध्याकाळच्या सत्रात झालेल्या रिसेप्शनमध्ये उमेदवारांना पॅनलिस्टना प्रश्न विचारण्याची, तसेच एकमेकाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या रिसेप्शनमधील टाउनहॉल सत्र उत्साही व संवादात्मक झाले. त्यामध्ये उमेदवारांनी, अपारंपरिक, पुनर्वापरयोग्य व पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करून संवर्धन, जतन व वाढ साधण्यासाठी भविष्यात्मक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने कौशल्यविकास करणे आणि संशोधन व विकास करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दिवसभर चाललेल्या मुलाखतींनंतर सर्वांचा उत्साह कौतुकास्पद होता. या वर्षी टाउनहॉलमध्ये के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त आणि व्हर्व्ह मासिकाच्या प्रकाशक व संपादक अनुराधा महिंद्रा याही सहभागी झाल्या होत्या. 

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search