Next
बाबा आमटेंना गुगलची अनोखी मानवंदना
जयंतीनिमित्त साकारले बाबा आमटेंचे खास डूडल
BOI
Wednesday, December 26, 2018 | 01:44 PM
15 0 0
Share this story


काही लोक आपल्या आयुष्यात असे उत्तुंग कार्य करतात, की त्यामुळे ते कायमच लोकांच्या मनात जिवंत राहतात. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे हे त्यापैकीच एक. कुष्ठरोगी आणि गरजूंच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण केलेल्या बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने एक खास डूडल बनवून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.

२६ डिसेंबर हा बाबा आमटे यांचा जन्मदिन. आपला देश आज त्यांची १०४वी जयंती साजरी करत आहे. गुगलने त्यांच्यासाठी बनवलेल्या या खास डूडलमध्ये स्लाइड शोच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. त्यामधून बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि गरजू लोकांसाठी आपले आयुष्य वेचले असल्याचे दाखवले गेले आहे.

याबाबत गुगलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘बाबा आमटे हे राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास ठेवणारे होते. १९८५मध्ये त्यांनी भारतयात्रा सुरू केली होती. याच दरम्यान वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर दौरा केला होता. या भारतयात्रेदरम्यान त्यांनी देशातील लोकांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरित केले होते.’

डॉ. मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांनी एकदा एका कुष्ठरोग्याला पावसात भिजत असताना पाहिले. त्याच्या मदतीसाठी कोणीच पुढे येत नाही, हे पाहून त्यांना अत्यंत वाईट वाटले. क्षणभर विचार करून ते त्या कुष्ठरोग्याला घरी घेऊन गेले आणि तिथून त्यांच्या या कार्याची सुरुवात झाली. कुष्ठरोगी आणि गरजू लोकांच्या सेवेचा ध्यास त्यांनी घेतला. याच कार्याचा एक भाग म्हणून वयाच्या केवळ ३५व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये कुष्ठरोग्यांना आपलंंसं करणारा ‘आनंदवन’ आश्रम सुरू केला. तसेच नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.

बाबा आमटे यांच्या सेवाकार्याचा हा वारसा त्यांच्या पुढील पिढ्यांनीही यथासांग सुरू ठेवला आहे. समाजकार्यासाठी आपले आयुष्य वेचून समाजाला एक नवी दिशा देणाऱ्या बाबा आमटे यांना विनम्र अभिवादन.

(आनंदवनाचा विकास या पुस्तकाचा परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आनंदवनाच्या पर्यटनासंबंधीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बाबा आमटे यांची आणि त्यांच्याविषयीची पुस्तके बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link