Next
‘पीएनजी’तर्फे ‘मीट अँड ग्रीट विथ सलमान खान’
प्रेस रिलीज
Wednesday, January 10, 2018 | 05:20 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पिंपरी येथे १२ जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार्‍या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या २७व्या दालनाच्या उदघाटनाच्या निमित्ताने ‘मीट अँड ग्रीट विथ बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

विश्वासार्हता आणि ग्राहक केंद्रित सेवांसाठी ‘पीएनजी’ ज्वेलर्स ओळखले जाते. ‘पीएनजी’तर्फे दिवाळीनिमित्त २१ सप्टेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१७ या कालावधीतील ५० भाग्यवान ग्राहकांना बॉलीवूडस्टार सलमान खानला पिंपरी येथील दालनात भेटण्याची संधी मिळणार आहे. या कालावधीत ज्या ग्राहकांनी ‘पीएनजी’च्या २५ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दालनांतून सोने किंवा हिर्‍यांच्या दागिन्यांची खरेदी केली आहे, अशांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आमंत्रित केले गेले आहे.

ग्राहकांसोबत सतत जोडलेले राहण्याच्या उद्देश्याने ‘पीएनजी’ ज्वेलर्स मंगळसूत्र आणि पैंजण महोत्सव, दाजीकाका गाडगीळ करंडक यांसारख्या आकर्षक नवीन ऑफर्स आणि स्पर्धा घेऊन येत असते.

या वेळी बोलताना ‘पीएनजी’ ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘ग्राहकांना दिलेल्या वचनाप्रमाणे ‘मीट अँड ग्रीट सलमान खान’ स्पर्धेचे ५० भाग्यवान विजेते घोषित करताना आम्हाला अभिमान होत आहे. जगभरातील आमच्या २५ दालनांमधून खरेदी मूल्यासंबंधित कोणताही निकष न ठेवता प्रत्येकी दोन विजेत्या ग्राहकांची नावे घोषित करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहक केंद्रितता हीच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची मूळ संस्कृती आहे. याचाच परिणाम म्हणून सर्व ग्राहकांना आनंदी ठेवण्यासाठी ‘मीट अँड ग्रीट’चे आयोजन केले होते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search