Next
‘कॉफी टेबल बुक’च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Saturday, July 07 | 05:16 PM
15 0 0
Share this story

पुणे : राज्यसभा सदस्य अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील प्रबोधन माध्यम प्रकाशनची निर्मिती असलेले ‘वंदना चव्हाण : अनरेवेलिंग ट्रू स्टेट्समनशिप’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी खासदार अ‍ॅड. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिलारे, प्रबोधन माध्यम प्रकाशनचे समन्वयक सारिका रोजेकर, सचिन सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘स्माइल’ येथील कार्यक्रमात सात जुलै रोजी दुपारी या ‘कॉफी टेबल बुक’च्या सहाव्या वर्षाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.

खासदार चव्हाण यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी, राज्यसभा सदस्य या नात्याने केलेले अभ्यासदौरे, पर्यावरण स्नेही उपक्रम, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, शहर विकास प्रश्‍नांवर केलेले काम याचा मागोवा या ‘कॉफी टेबल बुक’ प्रकारातील पुस्तकात घेण्यात आला आहे. ‘प्रबोधन माध्यम’च्या वतीने आयोजित या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते.
 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’च्या  सारिका रोजेकर, सचिन सूर्यवंशी, श्रीकांत वाघ यांनी परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link