Next
‘२८ किमीच्या अंतर्गत रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात करा’
BOI
Monday, September 03, 2018 | 04:21 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोहिमायतनगर : ‘वाशी व्हाया पळसपूर, डोल्हारी मार्गे विदर्भ जाणाऱ्या २८ किमीअंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवेमध्ये करून या अंतर्गत रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसराचा सर्वांगीण विकास करावा,’ अशी मागणी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केली आहे.

कुणाल राठोडया संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडचे अधिक्षक अभियंता यांना नगराध्यक्ष राठोड यांनी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘आंध्र-तेलंगणा, विदर्भ मराठवाडा जोडणारा हा रस्ता शहरापासून खूप जवळ येतो; परंतु सद्यस्थितीत या अंतर्गत रस्त्याची अवस्था फारच बिकट झालेली आहे. याच मार्गानजीक असलेले परमेश्वर देवस्थान हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे विदर्भ, आंध्र-तेलंगणाततून भाविक व व्यापारी मोठ्या संख्येने हिमायतनगर शहरात येत असतात. त्यातच मुंबई ते नागपूर, हैद्राबाद तिरुपती जाण्यासाठी हिमायतनगर रेल्वे मार्ग सर्वांसाठी जवळचा ठरतो; परंतु या खराब रस्त्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. जवळपास २८ किमीचा हा रस्ता सोईचा असला, तरी सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गामध्ये करून या अंतर्गत रस्त्याचा विकास करावा.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search