Next
‘कर्वे इन्स्टिट्यूट’मध्ये ‘एमएसडब्ल्यू’ पदव्युत्तर अभ्यासक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, May 23 | 03:47 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘पुण्यातील कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेसतर्फे एमएसडब्ल्यू-समाजकार्य हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे,’ अशी माहिती ​कर्वे समाज सेवा ​संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी दिली.   

दोन वर्षांच्या, पूर्ण वेळ, सेमिस्टर व चॉइस बेस क्रेडीट सिस्टमवर आधारित या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २१ जून रोजी देशपातळीवरील प्रवेश परीक्षा होणार आहे. परीक्षेचे प्रवेश अर्ज संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून, अर्ज डाऊनलोड करून, भरून महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश अर्ज जमा करता येतील. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ जून २०१८ असून, प्रवेश परीक्षा १९ जून रोजी आणि मुलाखत व गट-चर्चा २१ जून २०१८ रोजी होणार आहे.

कोणत्याही शाखेचा पदवीधर, तसेच ज्या विदयार्थ्यांनी २०१८मध्ये पदवी परीक्षा दिली आहे ते विद्यार्थीही प्रवेश अर्ज भरून प्रवेश परीक्षा देऊ शकतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधरांना नियमानुसार प्राधान्य दिले जाते.

​कर्वे समाज सेवा संस्था​ ही पुण्यातील व देशातील समाजकार्याचे शिक्षण देणारी एक नामवंत शैक्षणिक संस्था असून, ‘नॅक’ मानाकिंत ‘अ’ दर्जा प्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी : www.karve-institute.org
प्रवेश अर्ज व संपर्कासाठी पत्ता : कर्वे समाज सेवा​ संस्था, वनदेवी मंदिराशेजारी १८, हीलसाईड, कर्वेनगर, पुणे ४११ ०५२,
दूरध्वनी : ७५१७५ ६४२१०
ईमेल : kinsspune@gmail.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link