Next
‘स्त्री जन्माचे स्वागत ही समाजाची नैतिक जबाबदारी’
प्रेस रिलीज
Tuesday, March 20 | 05:46 PM
15 0 0
Share this story

 मराठी साहित्य परिषदेच्या कराड ग्रामीण शाखेच्यावतीने लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गजानन चेणगे, डॉ.बसवेश्वर चेणगे, शरद गाडे, मंगेश हिरवे,सचिन देशमुख, उदय थोरात आदी उपस्थित होते.

कराड : ‘स्त्री जन्माचे स्वागत करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी असून, त्यासाठी समाजाने व शासनाने आवश्यक ती जबादारी घेणे आवश्यक आहे, असे मत ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य परिषदेच्या कराड ग्रामीण शाखेच्यावतीने लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

मसाप कराड ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गोरख तावरे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांनी लिहलेला ग्रंथ आणि रोप देऊन  देशमुख यांचा गौरव करण्यात आला.    
या वेळी मसाप कराड ग्रामीण शाखेचे प्रमुख कार्यवाहक डॉ.बसवेश्वर चेणगे, सहकार्यवाहक शरद गाडे, खजिनदार मंगेश हिरवे, विश्वस्त सचिन देशमुख, उदय थोरात, सदस्य गजानन चेणगे आदी उपस्थित होते.

‘समाजातील स्त्रीचा जननदर कमी होत चालला असून त्यांचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.समलैंगिकता, बलात्कार अशा स्वरुपाची गुन्हेगारी व अनैतिकता वाढीस लागेल.त्यामुळे शासनस्तरावर याबाबत गांभीर्याने भूमिका घेणे गरजचे आहे', असे  देशमुख यांनी नमूद केले.   या वेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मसाप कराड ग्रामीण शाखेच्या कामकाजाची व उपक्रमांची माहिती घेतली. मसाप कराड ग्रामीणचे अध्यक्ष गोरख तावरे यांनी शाखेच्या आगामी योजनांबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक व स्वागत प्रमुख कार्यवाह डॉ.बसवेश्वर चेणगे यांनी केले. सहकार्यवाह शरद गाडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link