Next
रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय
प्रेस रिलीज
Tuesday, May 15 | 03:34 PM
15 0 0
Share this story

राष्ट्रीय गोकार्ट कॅड डिझाईंनिग स्पर्धेत डीकेटीईचा विजेता संघ

इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या ड्रिफ्टर्स संघाने ‘राष्ट्रीय अ‍ॅटो इंडिया रेसिंग चॅंपियनशिप २०१८’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. विविध राज्यांतील सुमारे ७०हून अधिक संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या सर्व संघामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाबरोबर अ‍ॅटोक्रॉसमध्ये ही द्वितीय क्रमांक व उत्कृष्ट ड्रायव्हर अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

ही ‘रेसिंग चॅंपियनशिप’ गोकार्ट रेसिंग अ‍ॅंड डिझाइनिंग पुणे येथील पीसीएनटीडीए ट्रॅफिक पार्क येथे झाली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना कार डिझाइनिंग आणि त्याचे कॅलक्युलेशन करण्यासाठी सादरीकरण करण्यास आमंत्रित करण्यात आले; तसेच या स्पर्धेमध्ये ब्रेक टेस्ट, अ‍ॅक्सिलरेशन टेक्स्ट, स्किडपॅड टेस्ट, अ‍ॅटोक्रॉस टेस्ट, प्री-इंडयुरन्स टेस्ट आणि इंडयुरन्स टेस्ट या प्रकारच्या वेगवेगळ्या चाचण्या घेऊन त्यावर निकाल घोषित केला. या सर्व टेस्ट मध्ये ‘डीकेटीई’ ड्रिफ्टर्स टीमने उत्कृष्ट कामगिरी केली व या मॉडेलचे परीक्षकांनी अत्यंत बारकाईने निरिक्षण करून ‘डीकेटीई’च्या संघास द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

‘अ‍ॅटो इंडिया रेसिंग चॅंपियनशिप’ ही स्पर्धा जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरते आहे. या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी कॅड लॅबरोटरीद्वारे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे यंत्रणा कार्यान्वित करण्याचे ज्ञान ‘डीकेटीई’मध्ये उपलब्ध केलेले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील कॅड डिझाइनिंग किंवा मॉडेलिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे; तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी ‘डीकेटीई’मध्ये सॉफ्टवेअर ट्रेनिंगचे वेळोवेळी आयोजन केले जात. यामुळे विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकविण्यास फायदा होत आहे.

टीम ‘डीकेटीई’ ड्रिफ्टर्स गेली चार वर्षांपासून सातत्याने अशा वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन विविध पारितोषिक मिळवत आहे; तसेच या टीमचे ड्रायव्हर अभिजीत कुडचे व अथर्व जोशी यांनी गोकार्ट ड्रायव्हिंगमध्ये प्राबल्य मिळवले आहे.  म्हणूनच संपूर्ण देशातील टीममधून अथर्व जोशी याला बेस्ट ड्रायव्हरचा सन्मानही मिळाला आहे. या टीममध्ये आदेश जाधव, अथर्व जोशी, निशांत गोडसे, प्रथमेश कदम, प्रतीक भक्ते, अभिजीत कुडचे, ओंकार चव्हाण, तिर्थराज पाटील, प्रतिष्ठा देशपांडे, नम्रता शिंदे, श्‍वेता माने, किरण रावळ, ओंकार मगदूम, अक्षय खाडे, आदर्श भटगुणकी, सचिन बुगड यांचा सहभाग होता.

डीकेटीई ड्रिफ्टर्स या संघाला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व सर्व विश्‍वस्त तसेच संस्थेचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, फॅकल्टी अ‍ॅडव्हायझर यु. एस. खाडे व जी. सी. मेकळके यांचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link