Next
हिमायतनगर शहरात प्रजासत्ताक दिन साजरा
नागेश शिंदे
Monday, January 28, 2019 | 11:42 AM
15 0 0
Share this story

ध्वजवंदन करताना नगराध्यक्ष कुणाल राठोडहिमायतनगर : शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांत, शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील नगरपंचायत कार्यालयात सकाळी ८.२० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष मो.जावेद गनी यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर नगरपंचायत कार्यालय येथे उपस्थित नागरिकांनी हिमायतनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेतली.


या वेळी जेष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, जिल्हा परिषद सदस्य समद खान पठाण, नगरसेवक रामभाऊ ठाकरे, प्रभाकर आण्णा मुधोळकर, अन्वर खान पठाण, सदाशिव सातव, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, गजानन चायल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सरदार खान पठाण, श्री. खयुम भाई, नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, सावन डाके, विनायक मेंडके, श्री. गुफ्रान, बाकी सेठ, उदय देशपांडे, हनुसिंग ठाकूर, मुन्ना जन्नावार, पापा पार्डीकर, कोमावर आप्पा, पळशीकर, शाम जक्कलवाड, फेरोज खान पठाण, मंगेश धुमाळे, दीपक कात्रे, अमोल धुमाळे, योगेश चिल्कावार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पंदिलवाड, जांबुवंत मिराशे, सोपान बोंपिलवार, दीपक सोनसळे, नागेश शिंदे यांसह नगरसेवक, नगरसेविका व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी, आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, गावातील प्रतिष्ठित नागरिक, बालाजी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिमायतनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेताना ग्रामस्थ.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link