Next
अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार
प्रेस रिलीज
Monday, August 06, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : राज्यभरातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, सीख या अल्पसंख्याक समाजातील दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार अवामी महाज या सामाजिक संस्थेतर्फे तसेच हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर यशवंत गायकवाड यांच्या हस्ते ११ ऑगस्ट रोजी आझम कॅंपस यथील डॉ. ए. आर. शेख असेम्ब्ली हॉल, येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान ५० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. यात जैन, ख्रिस्चन, बुद्ध, पारसी, शिख आणि मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील नऊ शालांत परीक्षा मंडळातून ९७ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी यासाठी निवडण्यात आले आहेत.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे (एमसीई) अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टचे सचिव झुबेर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली.

अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी, निमंत्रक सीराज सुतार, सह निमंत्रक सय्यद आरिफ अल्ताफ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शनिवार, ११ ऑगस्ट २०१८
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : डॉ. ए. आर. शेख असेम्ब्ली हॉल, आझम कॅंपस, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search