Next
लायन्स क्लबतर्फे मोफत मधुमेह तपासणी
BOI
Thursday, November 15, 2018 | 03:51 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना (डावीकडून) सतीश राजहंस, शाम खंडेलवाल, डॉ. चंद्रहास शेट्टी, डॉ. गौरी दामले व दिनकर शिलेदार.

पुणे : ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. १९ नोव्हेंबर) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे’, अशी माहिती लायन्स क्लब्जचे माजी प्रांतपाल लायन चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी लायन श्याम खंडेलवाल, लायन सतीश राजहंस, दिनकर शिलेदार, डॉ. गौरी दामले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लायन चंद्रहास शेट्टी म्हणाले, ‘नागरिकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता रॅलीने होणार असून, सिटीप्राईड थिएटर, कोथरुड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अशी ही रॅली निघणार आहे. त्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीमध्ये विद्यार्थी, खेळाडू, मधुमेह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक आणि लायन्स सदस्य सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी दहा ते साडेबारा या वेळेत मधुमेह व अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. त्यामध्ये इन्शुलिनविषयी समज-गैरसमज, मधुमेहाबाबत घ्यायची काळजी, लहान मुलांमधील मधुमेहाची कारणे व दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदान जागृती व तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी १२ ते तीन या वेळेत याच ठिकाणी मधुमेहासंबंधी तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत.’

‘या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शशिकांत सुतार, समाजरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. परवेज ग्रांट व समाज मित्र पुरस्कार प्राप्त डॉ. संजय पठारे, प्रांतपाल रमेश शहा, माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा रसिकलाल धारिवाल, उपप्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे, लायन अभय शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, दिलीप वेडे पाटील, मंजुश्री खर्डेकर, अल्पना वर्पे, पतित पावन संघटनेचे पुण्याचे शहराध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित असणार आहेत’, असेही संयोजकांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search