Next
‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ची ‘मोबिक्विक’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Tuesday, March 19, 2019 | 12:23 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील आघाडीची जीवनेइतर विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि मोबिक्विक या भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल वित्त सेवा कंपनीने आज सायबर- विमा कवच पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. या माध्यमातून अनाधिकृत आणि सर्व प्रकारची बँक खाती, डेबिट व क्रेडिट कार्ड्स तसेच मोबाइल वॉलेट्सद्वारे फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांविरोधात संरक्षण पुरविण्यात येणार आहे.

हा सायबर विमा अॅपद्वारे डिजिटल माध्यमातून दरमहा केवळ ९९ रुपयांत मिळवता येणार असून, त्यात ५० हजार रुपयांच्या सम इन्शुअर्डचा समावेश आहे. लोकसंख्येचा कॅशलेसकडे वाढता ट्रेंड लक्षात घेता डिजिटल वॉलेट्स म्हणडेच ई-वॉलेट्स किंवा मोबाइल वॉलेट्सची मागणी वाढली आहे. कॅशलेस व्यवहारांची संख्या वाढल्यावर सायबर गुन्हेगारीही विस्तारणार हे उघड आहे. दरमहा मोबिक्विक वॉलेटवर लाखो व्यवहार होत असतात.

‘मोबिक्विक’ युजर्सना आता ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ची व्यावसायिक सायबर विमा योजना मिळवता येणार आहे आणि ती घेणाऱ्यांना तणावमुक्त व सुरक्षित व्यवहारांचा लाभ घेता येणार आहे. हे धोरणात्मक सायबर विमा उत्पादन ग्राहकांना त्यांची विविध बँक खाती, डेबिट व क्रेडीट कार्ड्स तसेच मोबाइल वॉलेट्ससाठी चौफेर सुरक्षा पुरवण्याच्या हेतूने विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे. मोबिक्विक युजर्सना या विमा उत्पादनांअंतर्गत आपल्या वॉलेटमध्ये किंवा स्वतंत्र फॉरमॅटमध्ये पैसे भरताना त्यांच्या इच्छेनुसार हे विमा उत्पादन घेता येणार आहे. त्याचप्रमाणे डिजिटल दावा करण्याचीही सोय देण्यात आली आहे.

या संदर्भात ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले, ‘आम्ही कायमच इतरांपेक्षा पुढे राहून आकर्षक किंमतीत अभिनव उत्पादने पुरवली आहेत. मोबाइल वॉलेट्समुळे एकंदरीत व्यवहार सोयीस्कर व प्रभावी झाले आहेत; मात्र या ऑनलाइन व्यवहारांमध्ये युजर्सना एका नव्या प्रकारच्या जोखमीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या डेटा सुरक्षा हल्ल्याविरोधात सायबर विमा पुरवणे आवश्यक झाले आहे. ‘मोबिक्विक’बरोबरच्या भागीदारीमुळे ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’च्या नव्या युगातील जोखमी, तसेच आमच्या व्यावसायिक सहकाऱ्यांच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि अभिनव उत्पादन पुरवण्याचे प्रयत्न आणखी मजबूत झाले आहेत.’

या विषयी ‘मोबिक्विक’च्या सह- संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘आम्ही कायमच ट्रेंडसेटर राहिलो आहोत आणि ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत नाविन्यपूर्ण उत्पादने सादर केली आहेत. ग्राहकांना सायबर विमा पुरवणारी आमची पहिली मोबाइल वॉलेट कंपनी आहे. आज कित्येक लोक त्यांचे आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्यास पसंती देत आत हे लक्षात घेता हे उत्पादन आजच्या डिजिटल युगाची गरज झाले आहे. या क्षेत्रात अजून कोणी फारसे सक्रिय झाले नाही, मात्र शहरे तसेच गावांतील डिजिटल पेमेंट्सचा वाढता वापर पाहाता ते अतिशय आश्वासक क्षेत्र होत आहे.’

‘आम्ही केवळ मोबिक्विकवरच नव्हे, तर आमच्या ग्राहकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या सर्व बँकिंग आणि बिगर- बँकिंग व्यासपीठावर तणावमुक्त व्यवहार पुरवण्यासाठी बांधील आहोत. आम्ही या उत्पादनासाठी  आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सची करार केला आहे. आम्हाला खात्री आहे, की हे नाविन्यपूर्ण उत्पादन ग्राहकांना डिजिटल पेमेंट्सवर विश्वास ठेवण्यासाठी व त्याचा भीतीमुक्त, जास्त सक्रियपणे वापर करण्यासाठी मदत करेल. आम्ही लाखो भारतीयांच्या गरजा पुरवण्यासाठी अशी आणखी नाविन्यपूर्ण व परवडणारी उत्पादने पुरवण्यासाठी बांधील आहोत,’ असे टाकू यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search