Next
‘आकार’तर्फे स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान
प्रेस रिलीज
Saturday, April 21 | 02:51 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रा. राम वाघ व प्रा. प्रवीण मुंडे.पुणे : ‘केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेव आयोग (एमपीएससी) आदी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरीब, गरजू, होतकरू, दिव्यांग व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी येथील आकार फाउंडेशनतर्फे राज्यभर ‘आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विभागातील ३०० विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे,’ अशी माहिती ‘आकार’चे संस्थापक संचालक प्रा. राम वाघ यांनी दिली.


यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ‘आकार’चे व्यवस्थापकीय संचालक प्रा. प्रवीण मुंडे उपस्थित होते.


प्रा. वाघ म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे कष्ट करण्याची क्षमता, गुणवत्ता व स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे सामर्थ्य असूनही प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे, असे अनेक विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यापासून वंचित राहतात. अशा गुणवान विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळवण्याच्या प्रयत्नांना बळ देता यावे आणि प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आकाराला आणता यावे, आवश्यक स्पर्धा परीक्षांचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीची रचनात्मक यंत्रणा उपलब्ध उपलब्ध करून देता यावी यासाठी ‘आकार’च्या माध्यमातून पुणे, कोल्हापूर, सोलापूर व औरंगाबाद विभागात या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान शिष्यवृत्ती अभियानामार्फत प्रवेश परीक्षेचे आयोजन करणार आहोत.’


या शिष्यवृत्ती अभियानाच्या प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घेण्याचे आवाहन करतानाच पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर यांसह राज्याच्या इतरही जिल्ह्यात या परीक्षेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सोईनुसार या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेचे आयोजन २१ मे २०१८ ला कोल्हापूर, २३ मे रोजी सोलापूर, २५ मे रोजी उस्मानाबाद आणि २७ मे रोजी पुणे या नियोजित जिल्ह्यांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे आहे. या प्रवेश परीक्षेच्या पेपरचे स्वरूप ‘युपीएसीसी’ व ‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेसारखे असणार आहेत. या लेखी परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या आकार फाउंडेशन (पुणे) येथे २९ मे ते पाच जून २०१८ या कालावधीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत.


लेखी परीक्षा व मुलाखती याद्वारे विभागवार गुणवत्तेनुसार निवड झालेल्या १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के (‘एमपीएससी’ ५०, ‘यूपीएससी’ ५०) व इतर २०० विद्यार्थ्यांना ५० टक्के (‘एमपीएससी’ १००, ‘यूपीएससी’ १००) शिष्यवृत्तीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आकार फाउंडेशन येथे व्यवस्था केली जाणार आहे.


या शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेला १२ वी उत्तीर्ण, पदवीला असलेले व कोणत्याही शाखेतील पदवीधर झालेले विद्यार्थी बसू शकतील. १२ वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असणार आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासाठी या संकेतस्थळास भेट द्यावी. या परीक्षेचा निकाल फाउंडेशनच्या संकेतस्थळावर २८ मे रोजी जाहीर करण्यात येईल.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : www.aakarfoundation.org

अधिक माहितीसाठी : ८७६७९ ३०९३०, ९११२० ७८५३८

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link