Next
अंधशाळेत स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन उत्साहात साजरे
BOI
Friday, August 16, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this article:


पुणे : कोथरूड येथील ‘पूना स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ संस्थेत गुरुवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे झाले. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ आणि ‘हेल्पिंग हँड’ संस्थेच्या वतीने येथील विद्यार्थिनींना  झेंडे, फुगे, चॉकलेट आणि खाऊ देण्यात आला; तसेच या विद्यार्थिनींना शाळेसाठी उपयुक्त सँडलचे वाटप करण्यात आले.


ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनींनी उपस्थित कार्यकर्त्यांना राखी बांधली. या वेळी ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चे अध्यक्ष गिरीश गुरनानी आणि ‘हेल्पिंग हँड’चे उमेश गिरासे, विनायक वरपे, राहुल खंदारे, अमोल गायकवाड, अमोल सातकर, संदेश कोटकर, दुष्यंत मोहोळ यांच्यासह कार्यकर्ते आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. 


‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’, असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले. ‘झेंडा, फुगे, खाऊ आणि सँडल मिळाल्यानंतर या अंध विद्यर्थिनींच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद मनाला समाधान देणारा होता,’ असेही गुरनानी यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search