Next
नरेंद्र बोडके
BOI
Saturday, December 23 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘समुद्राचा दुपट्टा सतत सळसळता, आपण पाठवतो पावसाच्या लिपीतले संदेश, खरं तर आपण नसतोच- सगळी असण्याची चलबिचल, आपल्या पलीकडे, आपण निरभ्र, शांततेहून पारदर्शी, मौनाइतके बोलके,’ असं मांडणारे कवी आणि पत्रकार नरेंद्र बोडके यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.......
२३ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेले नरेंद्र रघुवीर बोडके हे आपल्या कवितांमधून संवेदनांचा थेट प्रत्यय देणारे कवी म्हणून ओळखले जातात. सत्यकथा, हंस, अनुष्ठुभ, पूर्वा, अस्मितादर्श अशा प्रतिष्ठित मासिकांमधून ते कविता लिहीत असत.

त्यांच्यावर गोव्याचे संस्कार होते. अवघ्या २२व्या वर्षी त्यांचा ‘पंखपैल’ हा पहिला कवितासंग्रह गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे प्रसिद्ध झाला होता. त्याच्यानंतर १४ वर्षांनी ‘सर्पसत्र’ हा कवितासंग्रह आला आणि तसाच गाजला होता.

सर्पसत्र, शुकशकुन, श्यामल, शोधवर्तन, हसता खेळता गडी, अनार्य, सन्मुख, सुमनस, स्वातंत्र्योत्तर गोमंतकीय मराठी कविता, अस्वस्थ शतकाच्या कविता अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
सात जानेवारी २०१२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link