Next
‘प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक’
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘पुण्याने आजपर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू दिले आहेत. अशा खेळाडूंच्या जोरावरच खेळ मोठा होत असतो. त्यामुळे खेळ आणि खेळाडू ही दोन्ही चाके समान राहिली तरच दोन्ही गोष्टींचा विकास झपाट्याने होतो. यासाठी प्रतिभावान खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्यास ते आपल्या खेळाच्या जोरावर आपले नाव जगभरात निश्चित पोहचवतील,’ असे प्रतिपादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले.

संग्राम प्रतिष्ठान पुणे स्पोर्ट्स क्लबतर्फे रेल्वे इन्स्टिट्यूटच्या मैदानावरील बॅडमिंटन हॉल येथे शिवछत्रपती व जिजामाता राज्य पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूंच्या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‘संग्राम प्रतिष्ठान’चे अध्यक्ष शिवाजी बुचडे, सुवर्णयुग कब्बडी संघाचे अध्यक्ष राजाभाऊ घोडके, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक गोविंद पवार, आंतरराष्ट्रीय अॅथलेटीक्स पंच सुनील शिवले, जगन्नाथ लाकडे, हर्षल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक भास्कर भोसले, आंतरराष्ट्रीय धावपटू स्वाती गाढवे, आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक गुरूबन्स कौर यांना सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन खेळाडू तेजश्री नाईक हिचा सन्मान तेजश्रीची आई भाग्यश्री नाईक यांनी स्वीकारला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव साठे, शक्तीकुमार सावंत, सचिव बापूराव जाधव, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी विशेष मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link