Next
‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’
सेवक संमेलनात राजू मदनकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:गडचिरोली : ‘आपले जीवन जगण्यासाठी आणि त्याची उंची वाढविण्यासाठी मानवाला गरज असेल, तर परमात्मा एक हे मार्ग स्विकारणे गरजेचे आहे. म्हणूनच मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे,’ असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी केले.

धानोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यात अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, बेटी बचाव-बेटी पढाव, कुटुंब नियोजन आदी विषयांवर जनजागृती करण्याच्या हेतूने हे सेवक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. धानोरा येथील आदिवासी गृह निर्माण सहकारी मर्या.च्या पटांगणात हे संमेलन झाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, तहसीलदार गणवीर, नगराध्यक्ष लिना साळवे, मंडळाचे सदस्य आणि संमेलनाचे उद्घाटक टिकाराम भेंडारकर, संजय चाचेरे, गोपाल बावनवाडे, माणिक मेश्राम, डॉ. गोविंदराव दोनाडकर, आयोजक व मार्गदर्शक दिवाकर ठेंगरे उपस्थित होते.

मदनकर म्हणाले, ‘आपण जो काम करीत आहोत, असा मानव धर्म जगात दुसरा निष्काम करणारा कर्म होऊ शकत नाही. आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्या शिकवणीने  प्रत्येक सेवकाने चांगले वागले पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्यापासून काही चांगले कामे होऊ शकते का हे पाहणे गरजेचे आहे.’

आमदार डॉ. होळी, माजी आमदार डॉ. उसेंडी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी १५ प्रकारच्या झांकी सादर केल्या. कार्यक्रमात आजुबाजूच्या परिसरातील सुमारे १५ हजार नागरिकांची उपस्थिती होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search