Next
खासगी बस सेवेच्या दरांमध्ये २० टक्क्यांची वाढ
बस व्यावसायिकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन दरपत्रक जाहीर
प्रेस रिलीज
Saturday, November 24, 2018 | 12:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : वाढते पेट्रोल व डिझेलचे दर, इतर कर, परमिट, विमा आणि मनुष्यबळाचा वाढीव खर्च आणि वाहनांच्या देखभाल खर्चात झालेली वाढ या कारणांमुळे खासगी बस सेवेचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय पुण्यातील बस व्यावसायिकांच्या संघटनांनी घेतला आहे.

पुण्यातील बस व्यावसायिकांची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ नोव्हेंबर २०१८ रोजी झाली. यात असोसिएशनचे उपाध्यक्ष राजन जुनावणे यांनी सेवेचे नवीन दरपत्रक जाहीर केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन मुरकुटे, सचिव किरण देसाई, तुषार जगताप, पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष आण्णा गायकवाड, पुणे डिस्ट्रिक्ट लग्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर उपस्थित होते. स्कूल बस, कंपनी बस, सहलीसाठी लागणाऱ्या बस, तसेच डेली सर्व्हिस वाहतूक करणाऱ्या बस व्यावसायिकांची या सभेत उपस्थिती होती.

‘डिझेल दरवाढीबरोबरच इतरही खर्चांमध्ये झालेल्या वाढीमुळे, तसेच मनुष्यबळ आणि वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च यामुळे बस व्यावसायिकांना अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सर्वानुमते बस सेवांच्या दरांमध्ये १५ ते २० टक्क्यांची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे जुनावणे यांनी या वेळी सांगितले.

पुणे बस ओनर्स असोसिएशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल किरण देसाई व तुषार जगताप यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘विविध जाचक नियमांमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने संघटनेकडून अनेकदा संघर्ष करून उत्तम कामगिरी बजावली आहे. स्थानिक पातळीवर बस व्यावसायिक व बस चालकांच्या हितासाठीही संघटना कटाक्षाने काम करते. संघटनेतर्फे नुकताच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह पाळण्यात आला. तीन हजार चालकांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात आले; तसेच त्यांचा अपघाती विमा उतरविण्यात आला. वाहनचालकांच्या डोळे तपासणीची मोहीम देखील संस्थेने राबवली असून, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व शारीरिक तपासणीची मोहीम सुद्धा हाती घेण्यात आली आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link