Next
बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मो पुण्यात दाखल
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 04:58 PM
15 0 0
Share this story

नवी बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मो सादर करताना बव्हेरिया मोटर्सचे डीलर प्रिंसिपल विशाल अग्रवाल आणि बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाच्या आफ्टरसेल्स विभागाचे डायरेक्टर आंद्रिएस हॅटेनहोस्ट

पुणे : सर्वात पहिली बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मो नुकतीच येथे एका शानदार समारंभात सादर करण्यात आली.बव्हेरिया मोटर्सचे डीलर प्रिंसिपल विशाल अग्रवाल आणि बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाच्या आफ्टरसेल्स विभागाचे डायरेक्टर आंद्रिएस हॅटेनहोस्ट यांनी सर्वात पहिल्या बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मोचे अनावरण केले.
 
बीएमडब्ल्यू  ग्रुप इंडियाचे प्रेसिडेंट विक्रम पावाह म्हणाले, ‘ट्रूली डिस्टिंक्टिव्ह सर्वात पहिली बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मो बीएमडब्ल्यूने शोध लावलेल्या एक्सक्लुसिव्ह स्टॅण्ड-अलोन कन्सेप्ट दर्शवते, ज्यामुळे ही कार उत्तम सुविधा देते. या कारमध्ये कोणत्याही ट्रेडमार्क ड्रायव्हिंग प्लेजरबाबत तडजोड न करता एैसपैस जागा असलेले इंटेरिअर आणि अधिक कम्फर्ट समाविष्ट आहे. या कारमध्ये डिझाइन डायनॅमिक्स व एस्थेटिक्सचे परिपूर्ण संतुलन आहे. अधिक उत्तम व विश्वसनीय एलीगन्ससह प्रत्येक राइडमध्ये आनंदाची व सुखद अनुभवाची खात्री मिळते. सर्वात पहिली बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मो स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या पेट्रोल व्हेरिएण्ट, ग्रॅन टूरिझ्मो स्पोर्ट लाइनमध्ये उपलब्ध असून,  बव्हेरिया मोटर्स  येथे  तिची नोंदणी सुरू आहे.  लवकरच  डिझेल व्हेरिएण्ट सादर करण्यात येणार आहे.’

बव्हेरिया मोटर्सचे डीलर प्रिंसिपल विशाल अग्रवाल म्हणाले, ‘दशकाहून अधिक काळापासून बेव्हेरिया मोटर्सने आपल्या प्रमुख ग्राहकवर्गाला सर्वोत्तम लक्युरी अनुभव दिला आहे. या सिरीजमधील ही अनोखी कार  ग्राहकांना आकर्षून घेते. आम्हाला विश्वास आहे की, ही नवी  बीएमडब्ल्यू ६ सिरीज ग्रॅन टूरिझ्मो नवीन सेगमेंटची निर्मिती करेल आणि पुण्यामधील वाढत्या लक्झ्युरी कार बाजारपेठेच्या क्षमता वाढवण्यामध्ये आम्हाला साह्य करेल.‘बीएमडब्ल्यू ६३० आय   ग्रॅन टूरिझ्मो स्पोर्ट लाइन’ची एक्सशोरूम किंमत  ५८ लाख  नव्वद हजार रुपये इतकी  आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link