Next
मनीषा मेश्राम यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार
मिलिंद जाधव
Monday, March 18, 2019 | 02:26 PM
15 0 0
Share this article:



कल्याण : अन्याय अत्याचार निर्मूलन समिती (महाराष्ट्र राज्य) राजमाता जिजाऊ, माता सावित्रीमाई, माता रमाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण येथे राहणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या कवियत्री मनीषा मेश्राम यांना साहित्यिक बॅ.अनिलराव वैद्य यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम नाशिकमधील रमाबाई हॉल येथे झाला.

मनीषा मेश्राम या कल्याण येथे राहत असून, शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच त्यांचा सहभाग असतो. सामाजिक कार्यक्रमांत त्या आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असतात. विविध कवी संमेलनात सहभागी होत वेगवेगळ्या प्रबोधनात्मक कविता त्या सादर करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नाशिक येथे कवियत्री मनीषा मेश्राम यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, साहित्यिक विजयकुमार भोईर, मास्टर राजरत्न राजगुरू, महालोक कवी कालेनंद कुंबेफळकर, अॅड. श्रीकृष्ण टोबरे, साहित्यिक जगदेव भटू, अॅड. प्रज्ञेश सोनावणे, कवी नवनाथ रणखांबे, कवी संजय मोरे, कवी मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search