Next
‘झुलवा’कार उत्तम तुपेंना मिळाले नवीन घर
रामदास आठवले यांच्या हस्ते नव्या घराच्या किल्ली सुपुर्द
BOI
Monday, June 24, 2019 | 03:07 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘लेखक-साहित्यिक चळवळी बळकट करण्यासाठी आपले आयुष्य लावतात; मात्र अनेक साहित्यिकांना वृद्धापकाळात हलाखीचे जीवन जगावे लागते. काही दिवसांपूर्वी ‘झुलवा’कार ज्येष्ठ लेखक उत्तम बंडू तुपे यांच्या हलाखीच्या जगण्याची वस्तुस्थिती माध्यमांनी समोर आणली होती. यापुढे दलित साहित्यिकांची उपेक्षा होऊ देणार नाही,’ असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून  ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे दुमजली घर उभे राहिले आहे. त्या घराचे हस्तांतरण रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, आमदार विजय काळे, नगरसेवक विजय शेवाळे, नगसेविका स्वाती लोखंडे, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, संपत जाधव, आयुब शेख, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, ‘उपेक्षित, दलित माणसाचे दुःख, वेदना तुपे यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. अशा थोर साहित्यिकाचा मला अभिमान आहे. त्यांच्या हलाखीच्या जीवनाकडे सर्वांचे लक्ष उशिरा गेले. या पुढे कोणत्याही दलित साहित्यिक विचारवंतांची उपेक्षा होऊ देणार नाही.’

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी तुपे यांची पूर्व परिस्थिती सांगून, पुणे महापालिका आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

(उत्तम बंडू तुपे यांची पुस्तके 'बुकगंगा डॉट कॉम'वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search