Next
खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान
प्रेस रिलीज
Tuesday, October 23, 2018 | 11:06 AM
15 0 0
Share this article:



पुणे : शौर्य दिनाचे औचित्य साधून सीमेवर लढता लढता वीरमरण आलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा व वीरपत्नींचा सन्मान खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला. येथील स्व. सौ. हिराबाई शिवाजी गलांडे फाउंडेशन व नॅशनल एक्स सर्व्हिसमेन को ऑर्डिनेशन कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

२९ सप्टेंबर २०१६ साली झालेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या निमित्ताने देशभरात शौर्य दिवस साजरा करण्यात येतो याच पर्वाचे औचित्य साधत फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फाउंडेशनचे महेंद्र गलांडे, नॅशनल एक्स सर्व्हिसमेन को ऑर्डिनेशन कमिटी, महाराष्ट्र राज्य यांचे सभासद, ब्रिगेडियर हेमंत महाजन हे देखील या वेळी उपस्थित होते.



हेमंत महाजन यांनी या वेळी देशाची सुरक्षितता, सर्जिकल स्ट्राइक आणि राफेल डील या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. याबरोबरच खासदार शिरोळे यांनी वीरजवान, वीरमातांना अभिवादन करून जवान सीमेवर असल्याने आम्ही देशवासीय शांततेने आयुष्य जगू शकतो, असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सुहास ल पुणतांबेकर नांदगाव जी नाशिक About 298 Days ago
अतिशय छान व एक प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे फोटो एक्सिबिशन होय
0
0

Select Language
Share Link
 
Search