Next
रत्नागिरीतील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांना उत्तम प्रतिसाद
BOI
Thursday, October 04, 2018 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

विजेत्या स्पर्धकांसह सोनल पेंडसे, ऋतुजा बालवडकर, सतीश शेवडे, शिल्पाताई पटवर्धन, डॉ. कल्पना मेहता, डॉ. रवींद्र घांगुर्डे व मनोज पाटणकर.


रत्नागिरी : रत्नागिरीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिवोऽहम नृत्य स्पर्धेत श्रावणी साने व वैभवी पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नटराज करंडक नृत्य स्पर्धेत आर्या काशीकर व शांभवी धर्माधिकारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीतर्फे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धांचे हे नववे वर्ष होते. शिवोऽहम ही स्पर्धा उपशास्त्रीय नृत्याची, तर नटराज करंडक ही स्पर्धा शास्त्रीय नृत्याची असते. या वर्षी स्पर्धेला सारस्वत बँक आणि माधुरी विजय देसाई यांचे प्रायोजकत्व लाभले होते. पुणे येथील कथ्थक गुरू सोनल पेंडसे व भरतनाट्यम् गुरू ऋतुजा बालवडकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. रत्नागिरीसह पुणे, देवगड, देवरुख, कोल्हापूर आदी भागांतून एकूण ४० स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सदस्य मनोज पाटणकर, प्रज्ञा भिडे, शालेय समिती अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता, पटवर्धन संगीत अकादमीचे मानद संचालक डॉ. रवींद्र घांगुर्डे, समन्वयक चिंतामणी दामले, नृत्यशिक्षिका मिताली भिडे, रूपाली लिमये, व्यवस्थापक ऋतुराज तेरेदेसाई, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुखटणकर, दिलीप केळकर, उदयराज सावंत यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे संयोजन नृत्यशिक्षिका मिताली भिडे, रूपाली लिमये यांनी केले.

स्पर्धेचा गटनिहाय गुणानुक्रमे निकाल पुढीलप्रमाणे : 
शिवोऽहम स्पर्धा : 
लहान गट - श्रावणी साने, कु. मांगले, ईशा टिकेकर, शिवांगी आखाडे. 
मोठा गट - वैभवी पवार, सोनाली आठल्ये, प्रियांका सुर्वे, सायली पाटील. 

नटराज करंडक स्पर्धा : 
लहान गट - आर्या काशीकर, ईशा टिकेकर, शिवांगी आखाडे, आर्या राऊळ.
मोठा गट - शांभवी धर्माधिकारी, सोनाली आठल्ये, ऋषाली अष्टेकर, वैष्णवी पुणतांबेकर. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search