Next
‘आमचा योगदिन दररोजच’
BOI
Thursday, June 21, 2018 | 02:48 PM
15 0 0
Share this article:सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून योगासने दररोज करून घेतली जात आहेत. त्यामुळे त्या शाळेसाठी रोजचा दिवसच योगदिन असतो. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र साजरा केला जात असताना, योगासने दररोज केली जावीत, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. ती अपेक्षा ही शाळा पूर्ण करत आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना योगासनांची गोडी लागली आहे. 

रोपळे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेली दोन वर्षे योगदिनाचे औचित्य साधून मुलांना योगासनांचे धडे दिले गेले होते. नंतर वर्षभर हा उपक्रम चालू ठेवण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच मुलांना दररोज योगासनांचे धडे मिळू लागले आहेत. मूल्यशिक्षणाचा तास झाल्यानंतर मुक्त हालचाली, सर्वांगसुंदर व्यायाम व सूर्यनमस्कार शिकवले जातात. त्यानंतर मुलांना योगासनांचे धडे दिले जातात. दररोज योगासने करून घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते आहे. शिवाय विद्यार्थी वर्गात नेहमी ताजेतवाने राहिल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊ लागल्याचे शिक्षक सांगतात. 

योगदिनाच्या पूर्वसंध्येला या शाळेला भेट दिली, तेव्हा शाळेतील चिमुकली मुले व मुली एका तालात योगासने करत असल्याचे दिसून आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण लोखंडे, प्रमोद लोणारकर, पद्मिनी व्यवहारे, वैशाली जगताप, अजिनाथ  पवार, तानाजी ढेकळे, शशिकांत कांबळे, समाधान आयरे, वर्षाराणी गोडसे, छाया समलखांब हे शिक्षक प्रयत्न करत आहेत.  

मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी सांगितले, ‘आमच्या शाळेतील मुले-मुली नियमितपणे योगासने करू लागल्यामुळे शाळेची गुणवत्तावाढ होऊ लागली आहे.’ ‘विद्यार्थ्यांकडून आम्ही दररोज योगासने करून घेत असल्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. आमचे अध्यापनाचे काम सोपे झाले आहे,’ असे योगासनांचे धडे देणारे सहशिक्षक अरुण लोखंडे म्हणाले.  दरम्यान, विद्यार्थ्यांना दररोज योगासनांचे धडे दिले जात असल्यामुळे या शाळेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

(या शाळेतील विद्यार्थ्यांच्या योगासनवर्गाची झलक आणि मुख्याध्यापक, तसेच शिक्षकांचे मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
राजीव प्रसाद , मुंबई About
अशा प्रकारे काम करणाऱ्या शाळा विरळ्याच आहेत . बाईट्स ऑफ इंडिया व त्यांचा बातमीदार यांनी ही बातमी आमच्या पर्यंत पोहोचवली . त्यामुळे फारच आनंद वाटला .
0
0

Select Language
Share Link
 
Search