Next
‘जीजीपीएस’मध्ये विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
BOI
Saturday, January 19, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी : येथील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (जीजीपीएस) १८ व १९ जानेवारी २०१९ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव शेवडे यांनी मुलांनी प्रदर्शनात मांडलेल्या प्रकल्पांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शानात पहिली ते पाचवीतील १००हून जास्त प्रकल्प मांडण्यात आले होते. या प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांकडून दिली जात होती.


या विषयी माहिती देताना प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पवार म्हणाल्या, ‘मुलांमध्ये असलेली क्षमता योग्य दृष्टीने वापरली जावी आणि मुलांना प्रत्येक गोष्टीमागील वैद्यानिक दृष्टीकोन समजावा या हेतूने शाळेत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे विज्ञान प्रदर्शन भरविले जात आहे. यासाठी आम्हाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असून, सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि मुख्य म्हणजे पालकांचे चांगले सहकार्य लाभत आहे.’


या आधी हे प्रदर्शन केवळ मोठ्या मुलांसाठी आयोजित केले जात होते; मात्र गेल्या तीन वर्षांपासून पहिलीपासूनच्या मुलांनाही यात सहभागी केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


मुलांनी पुठ्ठ्यांपासून बनवलेला रोबोचा पोशाख हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण होता. मुलांनी उत्तमोत्तम प्रकल्प साकारून सर्वांची वाहवा मिळविली. दोन दिवसांत शेकडो पालकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन मुलांचे कौतुक केले.

(सोबत प्रदर्शनाचा व्हिडिओ देत आहोत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search