Next
प्लास्टिक, थर्माकोलमुक्त दिंडी अभियान
BOI
Tuesday, June 25, 2019 | 01:42 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित छायाचित्र
पुणे : आषाढी वारीत लाखो भाविक सामील झालेले असतात. त्यामुळे या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर केला जातो. यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचते. त्यामुळे थं क्रिएटिव्ह या संस्थेने प्लास्टिक, थर्माकोलमुक्त दिंडी अभियान सुरू केले आहे.

गेली आठ वर्षे ही संस्था वारी मार्गावर पर्यावरण रक्षणासाठी काम करत आहे. वारीमार्गावर यंदा सुमारे सव्वा कोटी पत्रावळ्या वाटपाचा संस्थेचा संकल्प आहे, तर पुढील तीन वर्षांत दोन्ही पालखी मार्ग प्लास्टिक आणि थर्माकोलच्या कचऱ्यापासून मुक्त करण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेने याकरिता मागील वर्षांत पान-फूल व प्रसाद विक्रेत्यांच्या प्रबोधनात्मक कार्यशाळा घेतल्या आहेत आणि प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून मागील दोन वर्षांत तब्बल दोन लाख कापडी पिशव्यांचे वाटपही केले आहे.

या वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि विविध सेवाभावी संस्था व विद्यार्थी हे सर्व अभियानात सहभागी होणार आहेत. तसेच वारकरी संप्रदायातील चाळीस ह. भ. प. महाराज व दिंडीप्रमुख हेदेखील या अभियानात सहभागी होतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search