Next
दर्शन मोरेला ‘आशियाई बेंचप्रेस’मध्ये कांस्यपदक
दत्तात्रय पाटील
Saturday, October 27, 2018 | 11:11 AM
15 0 0
Share this article:कल्याण :
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खेळाची प्रचंड ऊर्जा आहे. परंतु कौशल्याचा अभाव व परिपूर्ण मार्गदर्शन मिळत नसल्याने हे खेळाडू मागे पडत असल्याचे चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर, अलीकडेच दुबई येथे झालेल्या आशियाई बेंचप्रेस स्पर्धेत गोवेलीच्या (ता. कल्याण, जि. ठाणे) जीवनदीप कॉलेजचा खेळाडू दर्शन मोरे याने भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.

या स्पर्धेत तो १२० किलो वजनी गटात खेळला. कल्याण तालुक्याच्या पोईसारख्या खेडेगावातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करतो, ही अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे परिसरातून दर्शनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या कॉलेजकडूनही त्याचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. भारतीय क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात महाराष्ट्रातील जे मोजके खेळाडू नावलौकिक कमावत आहेत, त्यात ग्रामीण भागातील खेळाडूही कुठे कमी नाहीत, हे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

आशियाई स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूला मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो; मात्र दर्शन अतिशय गरीब कुटुंबातील असल्याकारणाने त्याला परिसरातील अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केली होती. मानिवली येथील जय हनुमान जिममध्ये दर्शन सराव करतो. तेथील प्रशिक्षक नवनाथ गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले असल्याचे तो सांगतो. पॉवरलिफ्टिंगमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आताच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळून एकूण २० पदकांची कमाई त्याने केली आहे. 

पुढे वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. विद्यार्थ्यांना खेळाविषयी वेळोवेळी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यातील खिलाडू वृत्ती जागृत राहावी यासाठी प्रयत्न करणारे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आणि पंकज मोरे यांच्या सहकार्याने इथपर्यंत पोहोचता आले. आर्थिक मदत करणाऱ्या सर्वांचे आपण ऋणी आहोत, असे दर्शन मोरे याने सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search