Next
‘पेटीएम’तर्फे ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’चे सादरीकरण
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 04:13 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘पेटीएम’च्या ‘गेमपिंड’ या डिजिटल गेमिंग मंचातर्फे क्रिकेट प्रेमींसाठी आणि कार्ड गेमच्या चाहत्यांसाठी ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’च्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. ‘गेमपिंड’ने देश-विदेशांतील उच्च गुणवत्तेच्या स्टुडिओज आणि प्रकाशकांशी भागीदारी केली आहे. गेमपिक्स, फॅमोबी आणि शोल गेम्स यांच्या मदतीने लुडो, स्नेक वॉर्स, बॅडलॅंड्स, एट बॉल पूल आणि असे इतर अनेक गेम्स एकाच मंचावर आणले आहेत. युझरना हे गेम मोफत खेळता येणार असून, त्याव्यतिरिक्त पेटीएम कॅश, मोबाइल फोन आणि बाइक यांसारखी बक्षिसेही जिंकता येणार आहेत. 

‘गेमपिंड’चे सीओओ सुधांशू गुप्ता म्हणाले, ‘देशात सर्वांत मोठे गेमिंग डेस्टिनेशन उभारण्याचा आमचा उद्देश आहे. असे डेस्टीनेशन, जे आमच्या युझरना उत्कृष्ट गेम्स, तर देईलच शिवाय त्यांना खेळण्याचे काहीतरी बक्षीसही देईल. लुडो आणि स्नेक वॉर्स या गेम्समध्ये तसेच ट्रीव्हियासारख्या स्पर्धात्मक कौशल्याधिष्ठित रियल मनी गेममध्ये आम्हाला यश दिसते आहेच आणि आता क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’ सादर करण्यास उत्सुक आहोत. आम्ही सतत नाविन्याचा शोध घेत राहू आणि आमच्या वापरकर्त्यांसाठी रोमांचक आणि त्यांना बक्षिसे देणारे आणखी गेम्स घेऊन येऊ.’

फेब्रुवारी २०१८मध्ये सादर झालेल्या या ऑनलाइन गेमिंग मंचाचे वर्षभरात ३० दशलक्षपेक्षा जास्त नोंदणीकृत वापरकर्ते झाले आहेत. हा मंच वापरकर्त्यांना १००पेक्षा जास्त उच्च गुणवत्तेचे रियल मनी गेम्स देतो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search