Next
विधानसभेच्या उमेदवारीसाठी ‘राष्ट्रवादी’ने मागवले इच्छुकांचे अर्ज
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अंतिम यादी ठरणार
प्रेस रिलीज
Wednesday, June 26, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज एक जुलै २०१९पर्यंत राष्ट्रवादी पक्षाकडे दाखल करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

या अर्जांची छाननी तीन जुलैला होऊन जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाईल. उमेदवारी अर्ज प्रत्येक जिल्ह्यामध्ये संबंधित जिल्हाध्यक्षांकडेही सादर करता येणार असून, पक्षाच्या संकेतस्थळावर ऑनलाइनवरही अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय बैठका नुकत्याच पार पडल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदींसह इतर वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते.

या वेळी राज्यातील सर्व जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये शरद पवार यांनी सर्वांचे विचार ऐकून घेतले शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली व त्या-त्या जिल्ह्याचा आढावाही घेतला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search