Next
‘झी फाइव्ह’च्या वर्षपूर्तीनिमित्त सहा भाषांतील ७२ नवे शो
BOI
Monday, February 18, 2019 | 06:03 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘झी फाइव्ह’ हा सर्वसमावेशक मनोरंजन प्लॅटफॉर्म कमी वेळात लोकप्रिय ठरला आहे. १४ फेब्रुवारीला झी फाइव्हला एक वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहा भाषांमधील ७२ नव्या शोजची घोषणा करण्यात आली आहे. मार्च २०२०पर्यंत हे कार्यक्रम सुरू होतील असेही सांगण्यात आले आहे. 

हिंदी, तमिळ, तेलगू, मराठी, बंगाली आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये हे कार्यक्रम असतील. आत्तापर्यंत १९ कार्यक्रमांच्या लोगोंचे अनावण करण्यात आले असून त्यापैकी ११ कार्यक्रम हिंदी भाषेतले असून इतर कार्यक्रम स्थानिक भाषांमधील आहेत.

‘झी फाइव्ह’च्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यात अर्जून रामपाल, एस. श्रीनाथ, पूजा भट, शक्ती कपूर, साकिब सलीम, महेश भट, गोल्डी बहल, रायमा सेन, पायल सरकार, रिद्धी सेन, संजय डहाके आणि विक्रम गोखले या यांचा समावेश होता. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘झी फाइव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित गोएंका यांनी याविषयी माहिती दिली, ‘झी फाइव्ह’च्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तो आम्ही साजरा करत आहोत. स्थानिक भाषांमधून कार्यक्रमांची निर्मिती हे ध्येय आम्ही ठेवले आहे आणि त्यानुसार कार्यक्रमांची निर्मिती केली जात आहे. पुढील वर्षभरात झी फाइव्ह हे सर्वांत लोकप्रिय आणि जगभरात जास्तीत जास्त सबस्क्राईब केलेले पोर्टल असेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link