Next
महसूल विभाग प्रशासनाचा कणा : डॉ. दीपक म्हैसेकर
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
BOI
Friday, August 02, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे महसूल विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करावे’, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात, महसूल दिनानिमित्त गुणवंत अधिकारी-कर्मचारी यांचा डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त प्रताप जाधव, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे हे या वेळी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, ‘विविध योजनांच्या अंमलबजावणीत गावपातळीवरील अधिकारी-कर्मचारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या कामकाजावर प्रशासनाची प्रतिमा अवलंबून असते. प्रत्येकाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महसूल विभागाची भूमिका कायमच मदतीची राहिली आहे, त्यामुळेच सर्वसामान्य माणसाच्या कामाला प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. प्रशासनात केलेल्या सेवेबाबत आज ज्यांचा गौरव झाला, त्यांचा हाच दृष्टीकोन समोर ठेवत प्रत्येकाने सेवा करावी’, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, ‘प्रशासनात काम करताना सामाजिक कार्य करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवत सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करावे.  प्रशासनात काम करताना निर्णयक्षमता महत्त्वाची आहे. तसेच गावपातळीपासून जिल्हापातळीवरील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरत आहे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे म्हणाले, ‘आजचा पुरस्कार सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असून सर्वच अधिकारी व कर्मचारी हे चांगले काम करत आहेत’, हे सांगताना त्यांनी महसूल प्रशासनाने वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या वेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक चव्हाण, तलाठी संघटनेचे अध्यक्ष हेमंत नाईकवाडी, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून कार्य केलेल्या अधिकाऱ्यांचा व  कर्मचाऱ्यांचा महसूल दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी आभार मानले. या वेळी अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search