Next
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी टाटा ट्रस्टचे सहकार्य
प्रेस रिलीज
Thursday, October 05, 2017 | 05:47 PM
15 0 0
Share this article:

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांचे जीवनमान, डिजिटल साक्षरता, सांख्यिकी आधारित प्रशासन आणि लहान मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण याबाबत विविध योजनांना गती देण्यासाठी उद्देशाने महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट एकत्र आले आहेत. टाटा ट्रस्ट्मार्फत जिल्हा प्रशासनामध्ये सुलभता आणून जिल्ह्यातील समुदाय विकास निर्देशक सुधारणे, तसेच विद्यमान प्रकल्पांना गती देतानाच विकास कार्यक्रमांमध्ये प्रशासनाला मदत करण्याचे काम केले जाणार आहे. याबाबत नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि टाटा ट्रस्ट्सचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरमणन उपस्थित होते.

याबाबत बोलताना राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर हा एक अत्यंत दुर्गम जिल्हा असून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तांत्रिक आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी टाटा ट्रस्ट्स नेहमीच अग्रेसर असते. मी यासाठी श्री. रतन टाटा यांचा मनापासून आभारी आहे. ई-लर्निंगपासून ते बांबूसंदर्भातील संशोधन व प्रशिक्षणापर्यंत चंद्रपूरला राज्याच्या नकाशातील एक आघाडीचा जिल्हा म्हणून सामोरे आणण्यात टाटा ट्रस्ट्सने नेहमीच मोलाचा वाटा उचलला आहे.”

राज्य सरकारसोबत सुरू असलेल्या भागीदारी व टाटा ट्रस्ट्सच्या उपक्रमाबाबत बोलताना टाटा ट्रस्ट्सचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरमणन म्हणाले, ‘स्थानिक प्रशासनाच्या मदतीने चंद्रपूरच्या रहिवाशांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी टाटा ट्रस्ट्स सदैव प्रयत्नशील आहे. राज्य शासनाने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत, तसेच आम्हाला दिलेल्या संधीबाबत आम्ही राज्य शासनाचे आभार मानतो’.

राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यातर्फे विविध विकास योजनांवर एकत्रितपणे काम केले जाणार आहे. यामध्ये माहिती संकलित करणे, मूल्यांकन करणे, शिक्षण, तंत्रज्ञान आणि विश्लेषण म्हणजेच डेटा, इव्हेल्युशन,लर्निंग, टेक्नोलॉजी आणि अॅनालिसिस म्हणजेच डेल्टा (Data, Evaluation, Learning, Technology and Analysis (DELTA) या गावपातळीवरील सूक्ष्म योजना मुल, पोम्भुर्णा आणि जिवती या तीन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यापुढे या योजनांचा संपूर्ण जिल्ह्यात कार्यविस्तार करण्यात येईल. त्याशिवाय गाव विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी डेल्टा आणि अन्य कार्यक्रमांची मदत होईल. यामुळे गाव विकास योजनेचे काम बारकाईने होईल. 

 •  सरकारी जबाबदाऱ्या व आर्थिक नियोजनासाठी स्थापन केलेल्या सीबीजीए या संस्थेशी टाटा ट्रस्ट्स भागीदारी करणार असून त्यामुळे चंद्रपूर प्रशासनाला जिल्हास्तरीय आर्थिक राहणीमानाचे विश्लेषण करण्यासाठी तसेच निधीचा पुरवठा करण्यासाठी मदत मिळेल. हा प्रकल्प भारतातील पाच राज्यांमध्ये सुरू असून चंद्रपूर हे त्यापैकीच एक आहे. या प्रकल्पामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, ग्रामीण विकास आणि समाजकल्याण या घटकांचा समावेश होतो. 

• चंद्रपूरचा शिक्षण विभाग आणि टाटा ट्रस्ट्सतर्फे १० फिरत्या संगणक साक्षरता बसेस उपलब्ध केल्या जाणार असून त्याद्वारे यापुढील एक वर्ष ‘पालक मंत्री संगणक प्रशिक्षण प्रयोगशाळा’ प्रकल्प सुरू करण्यात येईल. त्याद्वारे साक्षरता आणि शैक्षणिक उपक्रमांना गती मिळेल. 

• टाटा ट्रस्ट्सतर्फे देशात पहिल्यांदाच पोक्सो कायद्यांतर्गत मुलांच्या कल्याणासाठी लहान मुलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रयत्नांमुळे पोक्सो कायद्याची अंमलबजावणी करणारा चंद्रपूर हा भारतातील पहिला जिल्हा ठरेल.लहान मुलांना शाळा, समाज आणि घरात होणाऱ्या लैंगिक व शारीरिक शोषणापासून सुरक्षित ठेवणे, ही या कायद्याची प्राथमिकता आहे. हा एक कल्पक असा प्रकल्प असून भारतात प्रथमच राबवण्यात येत आहे. त्यामुळे बाललैंगिकतेच्या आरोपांची प्रभावीपणे कार्यवाही करता येईल. ही योजना यशस्वी ठरल्यास, त्याची अन्य जिल्ह्यांमध्येही पुनरावृत्ती करता येईल. 

• दुर्लक्षित आणि गरजू महिलांना कुक्कुटपालन तसेच ब्रॉयलर कुक्कुटपालन करण्यास प्रोत्साहन देऊन व्यवसायाभिमुख इको-प्रणाली स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

• या वर्षाच्या सुरुवातीला चंद्रपूर येथे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे बांबूच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे तसेच बांबूवर आधारित राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना आपले कौशल्य दाखविण्याची आणि आपला व्यवसाय वाढीस लावण्याची संधी मिळणार आहे. या वेळी जिल्ह्यात बांबूपासून दातकोरणी (toothpick) बनवण्याचा कारखाना सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. 

• गुगल इंडियाच्या भागीदारीने हा डिजिटल साक्षरता उपक्रम राबवण्यात येणार असून त्याद्वारे ग्रामीण भागातील महिलांना इंटरनेटचे फायदे आणि त्याचे महत्त्व याबाबत जागरूक करण्यात येईल. आतापर्यंत हा कार्यक्रम ४०० गावांमध्ये राबवण्यात आला असून १४० इंटरनेट साथींना प्रशिक्षण देण्यात आले आहे; तसेच आतापर्यंत ३१ हजार ६०० जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. 

• चंद्रपूर जिल्हा प्रशासन, आरोग्य खाते, ग्राम पंचायती आणि अन्य सामाजिक घटकांसोबत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी टाटा ट्रस्ट्स आवश्यक ती पावले उचलणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search