Next
‘ब्रिटिश कौन्सिल’तर्फे समर प्रोग्राम
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ब्रिटिश कौन्सिलतर्फे चार ते १४ वयोगटांतील मुलांसाठी समर प्रोग्राम सादर करण्यात आला आहे. लहान मुले सर्जनशीलता, विचार, समस्या सोडविणे, आत्मविश्‍वास वाढविणे, संवाद यांसारखे समकालीन कौशल्य मनोरंजनात्मक व संवादात्मक उपक्रमाद्वारे शिकू शकतील, असा विचार करून हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.

हा समर कॅम्प गणेशखिंड रोडवरील रामसुख हाउस येथे तिसर्‍या मजल्यावर ब्रिटिश कौन्सिल येथे होईल. या कोर्समध्ये डिजिटल लर्निंग, पब्लिक स्पिकिंग, क्रिएटिव्ह राइटिंग यांसारख्या अनेक विषयांचा समावेश आहे. विविध बॅचेसद्वारे सोयीनुसार यात सहभागी होता येणार आहे. हा प्रोग्राम सात ते आठ वयोगटासाठी २६ ते ३० एप्रिल या दरम्यान, नऊ ते १० वयोगटासाठी दोन ते सहा मे, ११ ते १२ वयोगटासाठी दोन ते सहा मे आणि १३ ते १४ वयोगटासाठी आठ ते १२ मे या चार बॅचेसमध्ये होणार आहे. या कोर्सची फी लायब्ररीच्या सदस्यांसाठी चार हजार रुपये, तर सदस्य नसलेल्यांसाठी साडेपाच हजार रुपये आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search