Next
समाजशिक्षक प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांचा आंबेगाव भूषण पुरस्काराने गौरव
डॉ. अमोल वाघमारे
Monday, April 29, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:

आंबेगाव : शिक्षण क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजशिक्षक प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांना युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या (आंबेगाव तालुका, पुणे) वतीने आंबेगाव भूषण पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले. या वेळी आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे-पाटील, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतीय परंपरेत शिक्षण आणि शिक्षक यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षण हेच विकासाचे प्रवेशद्वार असते. शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांना खूप महत्त्व असते. मग हे शिक्षक प्राथमिक शाळेतील असोत किंवा महाविद्यालयीन स्तरावरील असोत, त्यांचे समाजाच्या जडणघडणीतील योगदान हे अत्यंत वरच्या पातळीवरचे असते. 

डॉ. हनुमंत भवारी हे असेच एक समाजशिक्षक. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील जांभोरी या गावातील हे प्राध्यापक. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन ते पाबळ (ता. शिरूर, जि. पुणे) येथील पद्ममणी जैन महाविद्यालयात रुजू झाले. शिक्षण हे केवळ मुलांना पदवी प्रदान करणारे नसते, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना रोजगाराची संधी कशी निर्माण करता येईल, ही भूमिका शिक्षणाने बजावली पाहिजे. त्याच्यातून एक चांगला नागरिक कसा घडेल, अशा प्रकारचे मूल्यसंस्कार त्याच्यावर बिंबविणे हा शिक्षणाचा त्यांच्या लेखी खराखुरा अर्थ आहे. त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर राबविलेल्या विविध उपक्रमातून शिक्षणाची ही भूमिका सार्थ करून दाखविली आहे. शिक्षणाची खरीखुरी संकल्पना साकार करण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड त्यांची शिक्षणाप्रति असलेली बांधिलकी स्पष्ट करते. 

महाविद्यालयीन स्तरावर संस्थाचालक व प्राचार्य यांचे मार्गदर्शन व त्यांची साथ यातून ते आपले काम चोखपणे पार पाडतात. अनेक महाविद्यालयीन मुलांना स्वतःच्या पायावर उभे करून एक चांगला माणूस घडविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाविद्यालयीन स्तरावर त्यांचे कार्य अत्यंत प्रामाणिक भावनेने सुरू आहेच; पण त्याबरोबरच आदिवासी भागांतील निरक्षर महिला साक्षर होण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी स्वखर्चाने त्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्यातून त्यांची समाजशिक्षकाची भूमिका समोर येते. 

शिक्षक म्हणजे ज्ञानाची पेरणी करून शिक्षणातून समाजपरिवर्तन कसे होईल, यासाठी सतत कार्यशील असणारी व्यक्ती असते. अलीकडे या बांधिलकीतून काम करणारे शिक्षक कमी होत असताना डॉ. प्रा. हनुमंत भवारी यांची तरुण वयातील कामगिरी शिक्षणप्रेमींच्या आशा पल्लवित करणारी ठरते. त्यांची शिक्षणविषयक भूमिका सामाजिक परिवर्तनाला चालना देणारी ठरेल, यात शंका नाही. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kokane. Mk. Dy. Dir. C M E. Pune About 91 Days ago
Congrach.sir
0
0
Kokane. Mk. Dy. Dir. C M E. Pune About 91 Days ago
Congrach.sir
0
0

Select Language
Share Link
 
Search