Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची ‘थरमॅक्स’मध्ये निवड
प्रेस रिलीज
Saturday, May 18, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

‘थरमॅक्स’ कंपनीत निवड झालेले ‘डीकेटीई’चे मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल विभागातील नऊ विद्यार्थ्यांची ‘थरमॅक्स’ या नामांकीत कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी ‘डीकेटीई’ व ‘थरमॅक्स’ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातंर्गत ‘थरमॅक्स’चा कॅम्पस प्लेसमेंट ‘डीकेटीई’मध्ये पार पडला. यात गुणवत्ता चाचणी, ग्रुप डिस्कशन, विविध संभाषणाद्वारे व गुणवत्तेच्या आधारे नऊ विद्यार्थ्यांची निवड कंपनीने केली आहे.

‘डीकेटीई’ व ‘थरमॅक्स’ या करारांतर्गत चार महिन्यांचा आणि एकूण २०० तासांचा पॉवर प्लॉट इंजिनीअरिंग हा कोर्स ‘डीकेटीई’तील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग आणि ‘थरमॅक्स’ यांच्या परस्पर सहकार्याने साकार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पॉवर प्लॉट इंजिनीअरिंग या विषयाच्या प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर पडली आहे. पदवी आणि पदव्युत्तरसाठी नवीन कल्पनांना विचारात घेऊन समाजाला उपयोगी पडणारे प्रकल्प बनविण्यासाठी ‘थरमॅक्स’ येथील तज्ज्ञ अभियंत्यांना मार्गदर्शन देणार आहे.

या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील हर्षल कोठावळे, अक्षय बोंगार्डे, सचिन आलदार, अभिजित कुंभार, भगवान कदम, रिझवान शेख, सुशांत शिंदे, शुभम पाटील, गणपती चव्हाण या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनीअरिंग विभागाचे टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांनी विशेष परीश्रम घेतले. या विद्यार्थ्यांना संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, उपसंचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. आर. नाईक, कोर्स को-ऑर्डीनेटर प्रा. व्ही. पी. गायकवाड यांसह सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search