Next
वीस कोटी नवे इंटरनेट वापरकर्ते वाढण्याची शक्यता
प्रेस रिलीज
Friday, March 23, 2018 | 06:01 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘वापरकर्त्यांच्या पसंतीच्या भाषेमध्ये इंटरनेट उपलब्ध केले तर संभाव्य वीस कोटीपेक्षा जास्त इंटरनेट  वापरकर्ते वाढण्याची शक्यता आहे’, असा निष्कर्ष इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि कंटर आयएमआरबी यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या ‘इंटरनेट इन इंडिक २०१७’ या अहवालात नमूद केला आहे. 

भारतातील ४८ कोटी  इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ३३ कोटी वापरकर्ते  इंटरनेट इन इंडिकचे नॉन-युनिक युजर असून, त्यापैकी  १९ कोटी  शहरी भागातील  नॉन-युनिक वापरकर्ते (५८ टक्के ) आहेत.  ग्रामीण भारतातील वापरकर्ते १४ कोटी (४२ टक्के) आहेत. नॉन-युनिक या संकल्पनेचा अर्थ असा, हे युजर केवळ इंडिकमध्येच इंटरनेटचा वापर करतात; तसेच त्यांच्या वापराचा केवळ लहान भाग इंडिकमध्ये असतो. 

या अहवालानुसार, ग्रामीण भारतामध्ये इंडिक कंटेंट वापरणाऱ्यांची संख्या तुलनेने उच्च ७६ टक्के  असल्याचे दिसून येते, तर शहरी भारतात अंदाजे ६६ टक्के  इंटरनेट वापरकर्ते इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात. सामाजिक-आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांमध्ये इंडिक कंटेंटचा वापर सर्वाधिक केला जातो. शहरी व ग्रामीण भागात एसईसी डी/ईचे अंदाजे ८० टक्के वापरकर्ते  इंडिक कंटेंट वापरत असल्याचे दिसून येते.
 
इंटरनेटवर इंडिकचा वापर ठरवण्यामध्ये वय हा लक्षणीय घटक असल्याचे निष्कर्षांतून दिसून येते. शहरी भारतातील ४५ वर्षे वयावरील अंदाजे ७५ टक्के वापरकर्ते   व ग्रामीण भारतातील ४५  वर्षे वयावरील अंदाजे ८५ टक्के वापरकर्ते  इंडिकमध्ये इंटरनेट वापरतात. शहरी भारतात इंडिकचा वापर कटाक्षाने मनोरंजनाच्या म्युझिक/व्हीडिओ स्ट्रीमिंग न्यूज व अन्य स्वरूपातील मनोरंजन अशा विविध स्वरूपांमध्ये मर्यादित आहे. सरासरी, इंडिकमधील इंटरनेटच्या एकूण वापरापैकी ७० टक्के  वापर असा उपक्रमांसाठी मर्यादित आहे. ऑनलाइन बँकिंग, नोकरीचा शोध किंवा तिकीट बुकिंग अशा महत्त्वाच्या सेवांच्या बाबतीत अजूनही लोकल कंटेंटचा वापर कमी होत असल्याचे दिसते (वीस टक्क्यांहून कमी). इंटरनेट युजरसाठी सर्रासपणे पहिला वापर असलेला सर्च इंजिनचा वापरही इंडिकमध्ये केवळ ३९ टक्के  केला जातो.

आयएएमएआयच्या मते, यातून इंडिकमधील अशा महत्त्वाच्या इंटरनेट सेवांना असलेल्या मर्यादा लक्षात येतात व त्यामुळे ग्रामीण भारतात व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गात इंटरनेटचा प्रसार होण्यावर निर्बंध येतात. इंडिकमधील इंटरनेट २३ टक्के  इंटरनेट नॉन-युजरना डिजिटल होण्यासाठी महत्त्वाचा प्रेरक घटक आहे, असेही अहवालात नमूद केले आहे. म्हणजेच, भारतात इंडिकमधील इंटरनेट कंटेंटचा प्रसार केल्यास अंदाजे २० कोटी पेक्षा अधिक नवे इंटरनेट वापरकर्ते  वाढू शकतात.

आयएएमएआयने अधोरेखित केले आहे की, इंटरनेट इन इंडिक केवळ इंडिकमधील कंटेंटपुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण डिजिटल इकोसिस्टीमसाठी लागू होतो. भविष्यात, संपूर्ण डिजिटल इंटरफेस सोयीचा करण्याच्या दृष्टीने यूआरएल, डोमेन नेम्स, की टॅग्स, इंडेक्सिंग यांना इंडिकमध्ये प्राधान्य देणे गरजेचे आहे. जगभर, चीनने इंटरनेट कंटेंटसाठी मँडरिन लिपीचा वापर करून इंटरनेट युजरची सर्वाधिक संख्या नोंदवली आहे. ही संख्या इतकी आहे की, इंटरनेटवर चायनिज ही इंग्रजीनंतरची दुसऱ्या क्रमांकांची  सर्वात लोकप्रिय भाषा आहे. याउलट, जगभरातील इंटरनेट कंटेंटमध्ये इंडिक कंटेंटचे प्रमाण जेमतेम ०.१ टक्के आहे.

आयएएमएआयच्या मते, डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी इंडिकमध्ये अधिकाधिक इंटरनेट सेवा देईल, इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढवेल व भारतातील सामाजिक-आर्थिक बाबतीत कमकुवत असलेल्या वर्गाला खऱ्या अर्थाने सक्षम करेल अशी इंडिक इंटरनेट सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link